Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: गोवंश तस्करी; 9 लाखांचा मुद्देमाल जप्त, 20 गोवंशाची सुटका
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
लक्कडकोट परिसरात विरूर पोलिसांची धडक कारवाई आमचा विदर्भ - अविनाश रामटेके, प्रतिनिधी विरूर स्टेशन (दि. 12 ऑक्टॉबर 2023) -         गोहत्या रोख...

लक्कडकोट परिसरात विरूर पोलिसांची धडक कारवाई
आमचा विदर्भ - अविनाश रामटेके, प्रतिनिधी
विरूर स्टेशन (दि. 12 ऑक्टॉबर 2023) -
        गोहत्या रोखण्यासाठी सर्व स्तरातून अनेक प्रयत्न केले जातात. अशीच एक धडक कारवाई विरूर पोलिसांनी लक्कडकोट परिसरात केली. गोवंशीय जनावरांचा पिकअप विरूर पोलिसांनी लक्कडकोट येथे पकडला. (Wirur police strike action in Lakkadkot area)

        विरूर पोलिसांना गोपनीय माहितीच्या आधारे दोन पिक अप वाहनांमध्ये गोवंश घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. लक्कडकोट परिसरात सकाळी विरूर पोलिसांनी नाकाबंदी केली असता त्यामध्ये वीस गोवंश अंदाजे किंमत 1 लाख 20 हजार रुपये व पिकअप क्रमांक MH-33 T-3941, MH-34 BG-3694 अंदाजे किंमत 8 लाख असा एकूण 9 लाख 20 हाराजांचा मुद्देमाल जप्त केला. घटनास्थळातून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून एक ड्रायव्हर घटनास्थळा वरून फरार झाला. पोलिसांनी प्राणी संरक्षण कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला. सदरची कारवाई API जयप्रकाश निर्मल, PSI अजय मडावी, हेड कॉन्स्टेबल सुनील मेश्राम, पोलीस शिपाई विजय तलांडे, प्रमोद मिलमिले, रामदास निवलकर, प्रवीण जुनघरे, होमगार्ड इलियास शेख, पतरु ठाकरे यांनी केली. (wirur station) (aamcha vidarbha)
12 Oct 2023

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

Emoticon
:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.

 
Top