पोडसा येथे पोलिसांची धाड
मनोरंजन क्लबच्या नावाखाली जुगार
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ९ ऑगस्ट २०२५) –
स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पथक आणि उप पोलीस स्टेशन लाठी येथील अधिकारी व अंमलदारांनी संयुक्त कारवाई करत पोडसा येथील मनोरंजन क्लबवर धाड टाकली. ही कारवाई राजीव समाधान मल्टीपरपज सोसायटी, हिरापूर, ता. कोरपना, जि. चंद्रपूर, शाखा पोडसा (रजि. क्र. एफ-००१४८११) येथे करण्यात आली. धाड दरम्यान चालक महेश्वर गोपालनायक अजमेरा, वय ४२ वर्ष, रा. चिंताकुंडा, ता. शिरपूर, जि. आसिफाबाद, तेलंगणा हा संयोजकांसोबत संगनमत करून मनोरंजनच्या नावाखाली अनधिकृत जुगार खेळवत असल्याचे आढळले. यामध्ये परवाना अटी व सुचनांचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्याचेही निष्पन्न झाले.
पंचनामा कार्यवाहीदरम्यान पोलिसांनी डीव्हीआर, ताशपत्ते, कॉईन, रजिस्टर आदी साहित्य असा एकूण ३,४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी क्लब चालक, संयोजक, जुगार खेळणारे सदस्य आणि अपप्रेरणा देणारे आरोपी यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या कोणत्याही क्लबमध्ये जुगार खेळविल्याची माहिती मिळाल्यास त्वरित जवळील पोलीस स्टेशन किंवा चंद्रपूर पोलीस नियंत्रण कक्षाच्या डायल ११२ वर संपर्क साधावा.
दरम्यान, परिसरात पुन्हा अशा प्रकारेचे मनोरंजनाच्या नावाने काही क्लब सुरू असून तिथेही जुगार खेळवत असल्याची चर्चा जनमानसात सुरु आहे. त्यामुळे पोलिस त्यांच्यावर केव्हा कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
#ChandrapurPolice #IllegalGambling #KorapnaNews #PodsaRaid #CrimeNews #MaharashtraUpdate #StopGambling #aamchavidarbha #vidarbha #chandrapurupdate #chandrapurian #chandrapur
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.