आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०४ फेब्रुवारी २०२६) -
वंचित बहुजन आघाडी तालुका राजुरा ची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका संपूर्ण ताकदीने लढवण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला. तालुका अध्यक्ष विजय जुलमे यांनी ही निवडणूक कार्यकर्त्यांची असून ती पूर्ण शक्तीनिशी लढवली जाईल, असे स्पष्ट प्रतिपादन केले. या बैठकीला चंद्रपूर जिल्हा महासचिव मधुकर उराडे आणि राजुरा तालुका निरीक्षक मधुकर वानखडे उपस्थित होते. जिल्हा महासचिव मधुकर उराडे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका, संघटनात्मक बांधणी आणि निवडणूक तयारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तालुका निरीक्षक मधुकर वानखडे यांनी आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण केली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे सर्व कार्यकर्ते एकजुटीने कामाला लागले असून संघटन मजबूत करण्यासाठी तालुक्यात सक्रिय हालचाली सुरू झाल्या आहेत.
राजुरा तालुक्यातील ज्येष्ठ नेते तसेच चंद्रपूर जिल्हा सदस्य सच्चिदानंद रामटेके यांनी तालुक्यात कार्यकर्ता मेळावा घेऊन निवडणुकीचे वातावरण निर्माण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच ग्राम शाखा गठीत करून पक्ष संघटन अधिक बळकट करण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. तालुका अध्यक्ष विजय जुलमे यांनी सांगितले की, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडी ही संपूर्ण निवडणूक ताकदीने लढवणार आहे. त्यासाठी संपूर्ण राजुरा तालुक्यात मोर्चेबांधणी सुरू असून इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याचे श्रेय संपूर्ण राजुरा तालुका कमिटीला जाते, असेही त्यांनी नमूद केले.
या बैठकीस तालुका उपाध्यक्ष मुरलीधर ताकसांडे, तालुका उपाध्यक्ष ऋषी रायपुरे, तालुका महासचिव नागोराव पडवेकर, दिलीप जुलमे, दिलीप भास्कर, शंकर दुर्गे, संतोष कांबळे, शहर अध्यक्ष किरणताई खैरे, मालाताई तामगाळगे, मारोती रामटेके, रविंद्र चंद्रागडे, रविंद्र चांदेकर, परशुराम वाघमारे, विठ्ठल धोटे, अशोक महेशकर, चरणदास झाडे, प्रभुदास वनकर, मारोती घागरगुंडे, कवडुजी वाघमारे, गजानन बारसिंगे, राजु जुलमे (कोच्ची) तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन तालुका महासचिव नागोराव पडवेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन तालुका उपाध्यक्ष मुरलीधर ताकसांडे यांनी केले.
#VanchitBahujanAghadi #VBARajura #RajuraPolitics #ZillaParishadElection #PanchayatSamitiElection #VijayJulme #ChandrapurDistrict #VBAWorkers #LocalBodyElections #MaharashtraPolitics
वंचित बहुजन आघाडी राजुरा, VBA Rajura Taluka Meeting, Chandrapur District VBA, Zilla Parishad Election Rajura, Panchayat Samiti Election Rajura, Rajura Political News, VBA Maharashtra Politics, Rajura Taluka Politics

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.