सम्मक्का-सरलम्मा यात्रे नंतर परिसर स्वच्छ
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०४ फेब्रुवारी २०२६) -
वर्धा नदी पात्रात सम्मक्का-सरलम्मा मंदिर परिसरात मागील एक महिन्यापूर्वी साजऱ्या झालेल्या उत्सवानंतर निर्माण झालेल्या अस्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नगर परिषद राजुरा आणि श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
नगर अध्यक्ष अरुण धोटे, उपाध्यक्ष दिलीप डेरकर आणि आरोग्य सभापती अनंतकुमार ताजने यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ८ ते १० या वेळेत सम्मक्का-सरलम्मा मंदिराजवळील संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली. नदी पात्रात आणि मंदिर परिसरात साचलेला कचरा, प्लास्टिक व इतर घाण गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला.
स्वच्छता मोहिमेनंतर उपस्थित सर्वांनी स्वच्छता शपथ घेतली. यावेळी नगर अध्यक्ष अरुण धोटे, उपाध्यक्ष दिलीप डेरकर आणि आरोग्य सभापती अनंतकुमार ताजने यांनी राजुरा शहर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. स्वच्छता ही केवळ अभियानापुरती मर्यादित न ठेवता दैनंदिन सवय बनवावी, असेही त्यांनी सांगितले. या उपक्रमात नगरसेवक पूनम गिरसावडे, नगरसेवक संध्या चांदेकर, नगरसेवक इंदुबाई निकोडे, नगरसेवक नीता बानकर, स्वीकृत सदस्य किशोर हिंगाणे, स्वीकृत सदस्य एजाज अहमद, नगरसेवक भूपेश मेश्राम, माजी नगराध्यक्ष रमेश नळे यांच्यासह विद्यमान सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. संभाजी वारकड, उपप्राचार्य डॉ. खैरानी, नगर परिषद राजुरा पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता सुमेध खापर्डे आणि नगर परिषदेचे इतर कर्मचारी उपस्थित होते. या संयुक्त उपक्रमामुळे नदी स्वच्छतेसह पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश शहरात पोहोचला आहे.
-----------------------
#WardhaRiverCleanliness #RajuraSwachhataAbhiyan #SwachhSurvekshan2025 #MajhiVasundharaAbhiyan #SwachhBharatMissionUrban #RajuraMunicipalCouncil #SammakkaSaralammaTemple #CleanWardhaRiver #EcoFriendlyRajura #GarbageFreeRajura #PlasticFreeEnvironment #MissionLiFE #IndianSwachhataLeague #SolidWasteManagement
#chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
(वर्धा नदी स्वच्छता अभियान) (सम्मक्का सरलम्मा मंदिर राजुरा) (नगर परिषद राजुरा स्वच्छता मोहीम) (माझी वसुंधरा अभियान राजुरा) (स्वच्छ सर्वेक्षण २०२५ महाराष्ट्र) (राजुरा शहर स्वच्छता) (श्री शिवाजी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय राजुरा) (अरुण धोटे नगराध्यक्ष राजुरा) (दिलीप डेरकर उपाध्यक्ष) (वर्धा नदी प्रदूषण) (पर्यावरण संरक्षण राजुरा)

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.