आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. 29 जानेवारी 2026) -
(शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय) स्थानिक शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय (Law College Republic Day Celebration) येथे 26 जानेवारी रोजी भारताच्या गणतांत्रिक व्यवस्थेला 77 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 77 वा गणराज्य दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ऐजाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. यावर्षी सेवानिवृत्त होत असलेले महाविद्यालयातील कर्मचारी राजू काकडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर ध्वजवंदन करून राष्ट्रगीत सादर करण्यात आले. (Shantaram Potdukhe Law College Chandrapur) (Republic Day Celebration in College) या कार्यक्रमास पदवीत्तर विभाग प्रमुख प्रा. डॉ. पंकज काकडे, पदवी विभाग प्रमुख डॉ. अभय बुटले, प्राध्यापिका डॉक्टर मनीषा आवळे, डॉक्टर कार, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख नंदकिशोर भंडारी यांच्यासह सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Constitution Day Awareness Program)
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. सरोज कुमार दत्ता यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनामुळे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. यावेळी प्राचार्य डॉ. ऐजाज शेख यांनी उपस्थितांना गणराज्य दिनाच्या शुभेच्छा देताना संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असून त्याची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी तरुण पिढीने जागरूक राहून सकारात्मक योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. (Students Republic Day Program) (Chandrapur Education News)
कार्यक्रमाच्या निमित्ताने विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी आकर्षक रांगोळी काढून तसेच रंगीत पताका लावून संपूर्ण महाविद्यालयीन परिसर सुशोभित केला होता. त्यामुळे संपूर्ण परिसरात देशभक्तीचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. या गणराज्य दिन सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधान मूल्यांची जाणीव, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश आणि लोकशाहीविषयी जागरूकता निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
- 77 वा गणराज्य दिन सोहळा 2026
- शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय, चंद्रपूर
#RepublicDay2026 #77thRepublicDay #ShantaramPotdukheLawCollege #LawCollegeCelebration #IndianConstitution #StudentsParticipation #EducationalNews #MaharashtraEducation #RepublicDayCelebration #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.