Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: भारतीय कोयला खदान मजदूर संघ
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
महिलांसाठी हल्दी कुंकू व जीवनरक्षक प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात भारतीय कोयला खदान मजदूर संघाच्या पुढाकाराने ३५० महिलांचा भव्य महिला मेळावा स...
महिलांसाठी हल्दी कुंकू व जीवनरक्षक प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात
भारतीय कोयला खदान मजदूर संघाच्या पुढाकाराने ३५० महिलांचा भव्य महिला मेळावा
सास्ती टाउनशिपमध्ये महिला सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. २९ जानेवारी २०२६) -
        बल्लारपूर तालुक्यातील सास्ती टाउनशिप येथील मनोरंजन केंद्रात भारतीय कोयला खदान मजदूर संघ वर्धा व्हॅली व बल्लारपूर क्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने हल्दी कुंकू व महिला सम्मेलन तसेच कुणाल हॉस्पिटल नागपूर यांच्या सहकार्याने बेसिक लाईफ सपोर्ट प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन 28 जानेवारी ला करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भारतीय कोयला खदान मजदूर संघ बल्लारपूर क्षेत्राचे अध्यक्ष प्रवीण मुनगंटीवार यांनी भूषविले. कार्यक्रमास अखिल भारतीय खदान मजदूर संघाच्या उपाध्यक्षा वर्षा पुडके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. (हल्दी कुंकू कार्यक्रम)

         कार्यक्रमात प्रमुख वक्त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चंद्रपूरच्या निवेदिता पातुरकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले. विशेष उपस्थिती म्हणून जेबीसीसीआय व कोल इंडिया मानकीकरण समितीचे सदस्य सुधीर घुरडे तसेच विदर्भ प्रदेश मंत्री सुवर्णलता बोंडे उपस्थित होत्या. मुख्य अतिथी वर्षा पुडके यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भारतीय मजदूर संघ ही कुटुंबवत्सल संघटना असून महिलांचा कुटुंबात व समाजात केंद्रबिंदूचा वाटा आहे. महिलांचा सन्मान झाला पाहिजे आणि महिलांनी नेतृत्वाच्या भूमिकेत पुढे आले पाहिजे, यासाठीच महिला सम्मेलनांचे आयोजन करण्यात येते. (महिला सक्षमीकरण कार्यक्रम)

        प्रमुख वक्त्या निवेदिता पातुरकर यांनी भारतीय संस्कृतीतील हल्दी कुंकूचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, हल्दी कुंकू ही केवळ परंपरा नसून महिलांमधील आपुलकी, प्रेम, एकता व सन्मानाचे प्रतीक आहे. कुणाल हॉस्पिटल नागपूरचे डॉक्टर सुनील हुलहुरे, डॉक्टर प्रेरणा शर्मा व त्यांच्या वैद्यकीय पथकाने महिलांना बेसिक लाईफ सपोर्टचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. आपत्कालीन परिस्थितीत प्राथमिक उपचार कसे करावेत, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बल्लारपूर क्षेत्रातील सिव्हिल विभागाच्या व्यवस्थापक श्रिया सुपेकर यांनी घरगुती कचरा वर्गीकरण अर्थात डोमेस्टिक वेस्ट सेग्रेगेशन कार्यक्रमाविषयी माहिती देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. (कोळसा कामगार महिला संघटना)
        महिला सम्मेलनात सांस्कृतिक कार्यक्रम, गीत गायन सादर करणाऱ्या महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात एकूण 350 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे संचालन भारतीय कोयला खदान मजदूर संघ बल्लारपूर क्षेत्राचे महामंत्री श्रीनिवास कोप्पुला तसेच वर्धा व्हॅली महिला प्रतिनिधी शशि मसिह यांनी केले. प्रस्ताविक भाषण विदर्भ प्रदेश मंत्री सुवर्णलता बोंडे यांनी मांडले. कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन वर्धा व्हॅली महिला प्रतिनिधी डॉ. नयन मत्ते यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी, पुरुष व महिला कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले. अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

#BallarpurNews #WardhaValley #WomenConference2026 #CoalWorkersUnion #BharatiyaMazdoorSangh #WomenEmpowerment #HaldiKumkumProgram #BasicLifeSupportTraining #KunalHospitalNagpur #WomenSafetyAwareness #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top