आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २७ जानेवारी २०२६) -
Sakhri Workshop Sangharsh Yuva Vikas Mandal साखरी (वा.) येथे संघर्ष युवा विकास मंडळाच्या वतीने स्वयंरोजगार, गृह व लघु उद्योगाला चालना देणारी एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. मंडळाच्या २५ वर्षपूर्तीच्या औचित्याने आयोजित या कार्यशाळेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून रोजगारनिर्मितीसाठी मंडळाने केलेले प्रयत्न सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहेत.
दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी साखरी (वा.) येथे आयोजित या कार्यशाळेत राजुरा परिसरातील युवक, युवती, महिला व पुरुषांसाठी स्वयंरोजगार, गृह उद्योग व लघु उद्योगांच्या संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. वेकोली जमीन अधिग्रहणातून कुटुंबातील एखाद्या सदस्याला नोकरी मिळालेली असली तरी शेतीवर कार्य करणाऱ्या अन्य कुशल हातांना रोजगार उपलब्ध व्हावा तसेच उर्वरित शेतकरी कुटुंबांचे जीवनमान उंचावावे, या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस व्यवस्थापन सल्लागार पुणे दत्तात्रय जी आंबोलकर, प्लास्टिक इंजिनिअरिंग व कौशल्य विकास केंद्र सीपेट चंद्रपूरचे प्लेसमेंट अधिकारी पुष्कर जी देशमुख, सिस्कॉन एज्युमेंट फाउंडेशन चंद्रपूरचे संजय जी दाणेकर यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन लाभले.
मार्गदर्शन करताना व्यवस्थापन सल्लागार दत्तात्रय जी आंबोलकर यांनी कल्पकतेने आणि योग्य नियोजनाने कमी भांडवलात विविध व्यवसाय सुरू करून यशस्वी व्यावसायिक वाटचाल करणे सहज शक्य असल्याचे प्रतिपादन केले. योग्य कौशल्य, सातत्य आणि बाजारपेठेची समज असल्यास ग्रामीण भागातील युवक मोठी झेप घेऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी तत्कालीन केंद्रीय रसायन मंत्री हंसराज अहिर यांच्या प्रयत्नातून विदर्भाला रोजगारासाठी वरदान ठरलेले सीपेट चंद्रपूर हे केंद्र आतापर्यंत सहा ते सात हजार युवकांना रोजगार देण्यात यशस्वी ठरल्याचे सांगितले. युवक व युवतींनी सीपेटमध्ये प्रवेश घेऊन कौशल्य विकास साधावा व स्वतःसाठी उत्तम रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघर्ष युवा विकास मंडळाचे अध्यक्ष राजू घरोटे होते. मंचावर ज्येष्ठ नागरिक रामचंद्र लांडे, सरपंच प्रणाली ताई मडावी, राजुरा येथील रुपेश जी भाकरे, कैलास जी कार्लेकर, बचत गट फेडरेशनच्या अध्यक्षा सौ. संगीता ताई आत्राम उपस्थित होत्या. या कार्यशाळेला परिसरातील युवक, युवती, महिला, पुरुष तसेच बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ॲड इंजि. प्रशांत घरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे कोषाध्यक्ष सुदर्शन बोबडे, मिथुन काटवले, सहसचिव अमोल डेरकर, अनिल गोरे, गजानन चोथले, अंकुश अडबाले, सूरज गोरे, अमित निमकर, राकेश उरकुडे, संदीप आस्वले, अनिकेत पिंपळशेंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
Self Employment Workshop Sakri
Rajura Employment News
Chandrapur Skill Development
Home Industry Training
Small Scale Industry Workshop
Self Employment for Youth
Women Self Help Group Training
CPET Chandrapur Placement
Employment Generation Vidarbha
Rural Entrepreneurship Maharashtra
Dattatray Ambolkar Guidance
#SakhriNews #SangharshYuvaVikasMandal #SelfEmploymentWorkshop #RajuraNews #ChandrapurDistrict #SkillDevelopment #RuralEmployment #HomeIndustry #SmallScaleIndustry #YouthEmployment #WomenEmpowerment #VidarbhaNews #MaharashtraNews #aamchavidarbha #vidarbha


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.