Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: न्यायालयात येताना महिलेला भरदिवसा मारहाण; राजुरात खळबळ
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
हाताच्या बोटाला दुखापत, छातीवर मार लागल्याचा आरोप यापूर्वीही दोनदा हल्ला झाल्याचा पीडितेचा दावा आमचा विदर्भ -  राजुरा  (दि. ०९ मार्च २०२६) –...
हाताच्या बोटाला दुखापत, छातीवर मार लागल्याचा आरोप
यापूर्वीही दोनदा हल्ला झाल्याचा पीडितेचा दावा
आमचा विदर्भ - राजुरा  (दि. ०९ मार्च २०२६) –
        न्याय मिळविण्यासाठी न्यायालयात तारखेसाठी येणाऱ्या एका महिलेवर भरदिवसा रस्त्यावर मारहाण झाल्याची धक्कादायक घटना राजुरा शहरातील पंचायत समिती चौकात घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा (एनसी) नोंदवून समज देऊन सोडल्याचा आरोप संबंधित महिलेने केला असून, आरोपीवर कठोर कारवाई करावी तसेच न्यायालयात येताना पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.

        मिळालेल्या माहितीनुसार, पोर्णिमा उमाजी रामटेके या दिनांक ६ मार्च २०२६ रोजी राजुरा न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणाच्या तारखेसाठी आल्या होत्या. त्या ऑटोमधून पंचायत समिती चौकात उतरल्या असता, तेथे आधीच थांबून असलेल्या रिता संतोष तुराणकर हिने त्यांना अडवून सर्वांसमोर बेदम मारहाण केल्याचा आरोप पोर्णिमा रामटेके यांनी केला आहे. या मारहाणीत त्यांच्या हाताच्या बोटाला गंभीर दुखापत होऊन त्या रक्तबंबाळ झाल्या तसेच छातीवरही मार लागल्याचे त्यांनी सांगितले. घटनेनंतर संबंधित महिलेने आणखी काही व्यक्तींना फोन करून बोलावल्याचेही पोर्णिमा रामटेके यांनी सांगितले. परिस्थिती अधिक बिघडू शकते याची जाणीव झाल्याने आपण तातडीने ऑटोमध्ये बसून न्यायालयाकडे निघालो, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर पोर्णिमा रामटेके यांनी राजुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करून अदखलपात्र गुन्हा (एनसी) नोंदविला आहे.

        मात्र यापूर्वीही रिता संतोष तुराणकर हिने दोन वेळा आपल्यावर हल्ला केल्याची तक्रार पोलिसांकडे दिली होती. तरीही प्रत्येक वेळी केवळ एनसी नोंदवून प्रकरण सोडून देण्यात आल्याचा आरोप पोर्णिमा रामटेके यांनी केला आहे. रिता संतोष तुराणकर ही आपल्या पतीच्या परिचयातील महिला असल्याचा दावा पोर्णिमा रामटेके यांनी केला आहे. आपल्या जीवाला धोका असल्याने आरोपीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच न्यायालयीन तारखांना येताना पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

        दरम्यान, पोर्णिमा रामटेके यांनी दिलेल्या माहितीनुसार सन २०१२ मध्ये त्यांचे वेकोलि येथील कर्मचारी उमाजी रामटेके यांच्याशी लग्न झाले होते. काही वर्षांनंतर घरगुती वाद वाढल्याने पतीने मारहाण करून घरातून हाकलून दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सध्या त्या आपल्या विधवा आईसोबत मध्यप्रदेशातील नेपानगर येथे माहेरी राहत असून न्यायालयात त्यासंदर्भातील दावा सुरू आहे. या घटनेमुळे न्याय मिळविण्यासाठी न्यायालयात येणाऱ्या महिलेलाच भररस्त्यात मारहाण होत असल्याने राजुरा शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पोर्णिमा रामटेके यांनी केली आहे.

#RajuraNews #RajuraCrime #WomenSafety #JusticeForWomen #PurnimaRamteke #RitaTurankar #CourtCaseRajura #MaharashtraNews #GroundReport #CrimeNews #LocalNewsMaharashtra #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top