आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २७ जानेवारी २०२६) -
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून श्री गुरुद्वारा गुरु सिंग सभा, चंद्रपूर यांच्या वतीने संचालित #Chandrapur, #RepublicDay, #KhalsaConvent खालसा कॉन्व्हेंट हायस्कूल, चंद्रपूर येथे भव्य व उत्साहपूर्ण प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. शिस्त, संस्कार आणि देशभक्ती यांचा सुरेख संगम असलेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध ENT व हेड नेक कॅन्सर सर्जन तसेच भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हा चंद्रपूरचे माजी अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टी जिल्हा चंद्रपूरचे महामंत्री डॉ. मंगेश मधुकर गुलवाडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रध्वज वंदनाने करण्यात आली. (Chandrapur) यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीत, नृत्य व नाट्य सादरीकरणाने संपूर्ण परिसर देशप्रेमाने भारावून गेला. Republic Day विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उत्कृष्ट कवायतीतून शिस्त, एकात्मता, संघभावना आणि राष्ट्रप्रेमाचे प्रभावी दर्शन घडले. यावेळी शैक्षणिक, क्रीडा तसेच विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, संयम आणि सुसंस्कार या कार्यक्रमातून प्रकर्षाने दिसून आले.
कार्यक्रमास श्री गुरुद्वारा गुरु सिंग सभा, चंद्रपूरचे अध्यक्ष सरदार चरणजीत सिंग बाधवा, उपाध्यक्ष सरदार चमकोरसिंग बसरा, उपाध्यक्ष सरदार पुरणसिंग जुनेजा, सदस्य सरदार परविंदर सिंग भाटिया, कोषाध्यक्ष सरदार सुरेंद्र सिंग गिल, सहसचिव अमरप्रित सिंग होरा यांची विशेष उपस्थिती होती. तसेच खालसा कॉन्व्हेंट हायस्कूलच्या प्राचार्या श्रीमती सिमरन सहानी, शिक्षकवृंद, पालकवृंद आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना प्रमुख अतिथी डॉ. मंगेश मधुकर गुलवाडे यांनी विद्यार्थ्यांनी शिस्त, संस्कार आणि देशभक्ती ही जीवनमूल्ये आत्मसात करून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी राष्ट्रसेवेत सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन केले. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून राष्ट्रीय एकात्मता, देशप्रेम आणि जबाबदार नागरिक घडविण्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचल्याचे त्यांनी नमूद केले.
#ChandrapurRepublicDay #KhalsaConventHighSchool #KhalsaConventChandrapur #RepublicDayCelebrationChandrapur #ChandrapurSchoolNews #ChandrapurEducationNews #RepublicDaySchoolProgram #PatrioticProgramInSchool #StudentsPatriotismIndia #DisciplineAndValuesInEducation #MangeshGulwade #drmangeshgulwade #ChandrapurBJPLeader #ENTCancerSurgeonChandrapur #GurudwaraGuruSinghSabha #LocalNewsChandrapur #VidarbhaEducationNews #MaharashtraSchoolNews #aamchavidarbha #vidarbha


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.