कामगार कल्याण केंद्र ऊर्जानगर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २७ जानेवारी २०२६) -
Maharashtra Labour Welfare Board Chandrapur कामगार कल्याण केंद्र ऊर्जानगर, चंद्रपूर येथे भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष नारायण चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
• Republic Day celebration Ujjanagar Chandrapur
• 77th Republic Day Chandrapur
• Chandrapur Labour Welfare News
हा कार्यक्रम राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष नरेंद्र रहाटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गुणवंत कामगार संतोष परनाटे, देवराव कोंडेकर, धर्मेंद्र कनाके तसेच ज्येष्ठ नागरिक देठे काकाजी उपस्थित होते. मान्यवरांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्व विशद करत संविधानिक मूल्ये, लोकशाही आणि कामगार हक्क यावर आपले मनोगत व्यक्त केले व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत शुशुमंदिरमधील बालगोपालांना लाडू व चॉकलेटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे कार्यक्रमाला सामाजिक व मानवी स्पर्श लाभला.
या कार्यक्रमाला गुणवंत कामगार पांडुरंग बोबडे, मारोती पिंपळशेंडे, तसेच ज्येष्ठ नागरिक आणि ऊर्जानगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते. संचालन देवराव कोंडेकर यांनी केले. केंद्र संचालिका मोहना खोब्रागडे यांनी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती देत उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कामगार कल्याण केंद्राच्या कर्मचारी मोहना खोब्रागडे, कविता सदाफळे, सुवर्णा उपरे यांनी विशेष सहकार्य केले.
• Ujjanagar Republic Day Function
• Maharashtra Labour Welfare Activities
• Workers Welfare Program Chandrapur
• Chandrapur Local Government News
• Republic Day Flag Hoisting Chandrapur
• Labour Welfare Scheme Maharashtra
• Community Welfare Program Ujjanagar
• Public Event Chandrapur District
• Indian Constitution Celebration Chandrapur
• Chandrapur District Republic Day News
#RepublicDayCelebration #UjjanagarChandrapur #LabourWelfareCenter #IndianConstitution #ProudMoment #CommunityCelebration #WorkersWelfare #kamgarkalyankendraurjanagar #NarayanChavan #NarendraRahate #SantoshParnate #DevravKondekar #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.