आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. २७ जानेवारी २०२६) -
राजुरा तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील पाच युवकांची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कन्नमवार अभ्यासिका, कन्नमवार सभागृह येथे गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. देशसेवेची प्रेरणा देणारा हा सत्कार सोहळा उपस्थितांसाठी अभिमानाचा क्षण ठरला.
भारतीय सुरक्षा दलात निवड झालेल्या युवकांमध्ये सीआयएसएफमध्ये हर्षल धनवलकर, बीएसएफमध्ये आशिष तुंबडे, सीआरपीएफमध्ये समय ठमके व युवराज कुंचेवार, तसेच सीआयएसएफमध्ये आंचल भोयर यांचा समावेश आहे. ग्रामीण व शेतकरी कुटुंबातून येत कठोर परिश्रम, चिकाटी आणि देशसेवेची भावना जपत या युवकांनी हे यश संपादन केले आहे. या यशाबद्दल आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुराचे सचिव अविनाश जाधव यांनी पाचही विद्यार्थ्यांना शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरविले. युवकांच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे कौतुक करत त्यांनी तरुणांनी शिक्षणासोबत शारीरिक व मानसिक सक्षमतेवर भर देण्याचे आवाहन केले.
या सत्कार समारंभाला आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुराचे कोषाध्यक्ष साजिद बियाबानी, शिवाजी महाविद्यालय राजुराचे प्राचार्य डा. एस. एम. वारकड, उपप्राचार्य डा. राजेश खेराणी, सचिन येगीनवार, प्रा. बी. यु. बोर्डेवार उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी निवड झालेल्या युवकांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सारिका साबळे यांनी केले तर आभार उपप्राचार्य डा. राजेश खेराणी यांनी मानले. या यशामुळे कन्नमवार अभ्यासिकेचे कार्य आणि ग्रामीण भागातील युवकांची देशसेवेतील भूमिका अधोरेखित झाली आहे.
#IndianArmedForces #YouthInUniform #KannamwarAbhyasika #RepublicDayHonour #RuralYouthSuccess #ServiceToNation #ProudMoment #HarshalDhanwalkar #CISF #AshishTumbde #BSF #SamayThamke #YuvrajKunchewar #CRPF #AanchalBhoyar #CISF #AvinashJadhav #Secretary #AdarshShikshanPrasarakMandalRajura #SajidBiabani #Principal #ShivajiCollegeRajura #DrSMWarkad #RajeshKherani #SachinYeginwar #BUBordewar #SarikaSable #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.