Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: मुलांच्या प्रेमामुळे कार्याची प्रेरणा अधिक वाढली - पोलिस निरीक्षक सुमित परतेकी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मुलांच्या प्रेमामुळे कार्याची प्रेरणा अधिक वाढली - पोलिस निरीक्षक सुमित परतेकी ब्लॅक डायमंड प्री-स्कूलकडून पोलिसांना राखी बांधून सन्मान राजु...
मुलांच्या प्रेमामुळे कार्याची प्रेरणा अधिक वाढली - पोलिस निरीक्षक सुमित परतेकी
ब्लॅक डायमंड प्री-स्कूलकडून पोलिसांना राखी बांधून सन्मान
राजुरात रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम
आमचा विदर्भ -  दीपक शर्मा
राजुरा (दि. ९ ऑगस्ट २०२५) –
        रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री-स्कूलने एक विशेष उपक्रम राबवून नैतिकतेचा संदेश दिला "तुम्ही आहात म्हणून आम्ही सुरक्षित आहोत". या उपक्रमात शालेय विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक राजुरा पोलीस स्टेशनमध्ये एकत्र आले. पोलिसांचे अथक परिश्रम आणि संरक्षणाची सेवा याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुलांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हाताला राख्या बांधल्या. हा उपक्रम जनतेचा आणि पोलिस दलाचा भावनिक बंध अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री-स्कूलने आयोजित केला होता. पारंपरिक विधीनंतर मुलांच्या आणि पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. मिठाईचे वाटप करण्यात आले. पोलिसांनी मुलांना आशीर्वाद देत त्यांच्या प्रेम आणि आदराच्या भावनेबद्दल आभार मानले.
        या प्रसंगी पोलीस निरीक्षक सुमित परतेकी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक लोकरे यांनी सांगितले की, मुलांकडून मिळालेला प्रेम आणि आदराचा भाव हा खरोखरच हृदयस्पर्शी आहे. हा क्षण नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अधिक जोमाने काम करण्याचा संकल्प दृढ करणारा आहे. या कार्यक्रमातून रक्षाबंधनासारख्या सणांचे सांस्कृतिक महत्त्व टिकून राहते तसेच नागरिक आणि सेवा देणाऱ्यांमध्ये परस्पर आदर आणि विश्वासाचा पूल बांधण्यास मदत होते.
        ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री-स्कूल ही प्ले स्कुल ते दुसरी इयत्तेपर्यंत शिक्षण देणारी संस्था असून लहान मुलांना अभ्यासासोबत विविध सांस्कृतिक सण व उपक्रमांचा प्रत्यक्ष अनुभव दिला जातो. सल्लागार सदस्य संदीप मालेकर आणि जयश्री मालेकर, केंद्र संचालक अँड. मनोज काकडे, संस्था अध्यक्ष शुभांगी धोटे, मुख्याध्यापिका व शाखा प्रमुख सीमा आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका आलिशा सय्यद, प्रीती सिंग, फिजा शेख, मानसी, प्रणाली नगराळे, स्नेहल कोंडावार, ममता यांनी कार्यक्रम यशस्वी केला. मदतनीस ममता, अर्चना आणि सुषमाताई यांचे विशेष सहकार्य लाभले. पालकांनी शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले व मुलांना प्रत्यक्ष अनुभवातून दिले जाणारे शिक्षण प्रभावी असल्याचे सांगितले.

#RakshaBandhan #RajuraPolice #BlackDiamondSchool #RespectForPolice #CommunityBonding #CulturalValues #policestationrajura #advmanojkakde #shubhangidhote #sumitparteki #MaharashtraNews #aamchavidarbha #vidarbha #chandrapurupdate #chandrapurian #chandrapur #rajuraupdate #educational

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top