Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ९० व्या वर्षीही शिक्षणाचा दीप उजळणारे सेवानिवृत्त शिक्षक हिरामण श्रीकुंडवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
''गुरुजींच्या ज्ञानयात्रेला सलाम'' माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते सत्कार ९० व्या वर्षीही शिक्षणाचा दीप उजळणारे सेवान...
''गुरुजींच्या ज्ञानयात्रेला सलाम''
माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते सत्कार
९० व्या वर्षीही शिक्षणाचा दीप उजळणारे सेवानिवृत्त शिक्षक हिरामण श्रीकुंडवार
आमचा विदर्भ -  अनंता गोखरे
राजुरा (दि. ९ ऑगस्ट २०२५) –
        स्वातंत्र्यपूर्व काळात गरीब धोबी कुटुंबात जन्म, गाठलेले ज्ञानाचे उच्च शिखर आणि साधेपणाची पचवलेली जीवनशैली… हा प्रवास कुण्या मोठ्यामाणसाचा नव्हे, तर जिल्हा परिषदेच्या शाळेत तब्बल ३५ वर्षे शिक्षक म्हणून सेवा करणाऱ्या हिरामण श्रीकुंडवार यांचा आहे. वयाची ९०वी पार करूनही त्यांची उत्साहाने भरलेली नजर, मनामध्ये अजूनही तरुणाला लाजवेल असे चैतन्य, आणि आयुष्यभर शिक्षण देतानाचा आत्मिक आनंद… अशा गुरुजींचा व त्यांच्या जीवनसाथीचा सत्कार नुकताच मोठ्या भावपूर्ण वातावरणात झाला.

        माजी आमदार सुदर्शन निमकर (Ex MLA Sudarshan Nimkar) आणि सौ. वर्षाताई निमकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन हा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे सुदर्शन निमकर हे स्वतः गुरुजींचे माजी विद्यार्थी होते. ‘माझ्या हातून घडलेली ही पालवी आज मोठे झाड होऊन मला वाकून नमन करत आहे’ अशा शब्दात हिरामण श्रीकुंडवार यांनी भावना व्यक्त करत हा क्षण ‘भाग्यवान’ असल्याचे सांगितले.

        ६ ऑगस्ट १९३५ रोजी राजूरा येथे बाराबलुतेदारातील गरीब धोबी समाजात जन्मलेले (Hiraman Shrikundwar) हिरामण श्रीकुंडवार हे त्या काळात शिक्षणाच्या प्रकाशाचा झोत घेऊन दुर्गम भागात गेलेले ज्ञानयोद्धा होते. १९५८ मध्ये फक्त ९० रुपयांच्या पगारावर नोकरीची सुरुवात करून त्यांनी संपूर्ण आयुष्य शिक्षणासाठी वाहून घेतले. जिवती तालुक्यातील शेडवाई सारख्या दुर्गम भागात त्यांनी अध्यापन केले. याशिवाय माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या चुनाळा गावात तब्बल १० वर्षे सेवा बजावली. आज सुदर्शन निमकर जे काही आहेत, ते हिरामण श्रीकुंडवार यांच्या शिकवणुकीमुळेच, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

        धर्मपत्नीनेही खांद्याला खांदा लावून आयुष्यभर साथ दिली. आजही त्यांचा उत्साह व व्यक्तिमत्त्व तरुणांनाही प्रेरणा देणारे आहे. या सोहळ्याला माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, कार्यक्रम आयोजक मुरलीधर श्रीकुंडावार, संजय श्रीकुंडावार यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, आप्तेष्ट, सामाजिक कार्यकर्ते आणि धोबी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. एका गुरुजींचा सन्मान हा केवळ त्यांचा वैयक्तिक गौरव नसून, संपूर्ण शिक्षक समाजाचा अभिमान असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

#InspiringTeacher #90YearsYoung #GuruShishyaBond #LifelongEducation #FromHumbleBeginnings #TeachingLegacy #RajuraPride #aamchavidarbha #vidarbha #chandrapurupdate #chandrapurian #chandrapur #hiramanshrikundwar #ExMLA #sudarshannimkar

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top