बारावी नंतर करिअर निवडीत मिळाली नवी दिशा
गुरुनानक कॉलेज ग्लोबल फाउंडेशन बल्लारपूर तर्फे करिअर मार्गदर्शन व गुणवंतांचा सत्कार
आमचा विदर्भ - राजेश अरोरा
बल्लारपूर (दि. २६ ऑगस्ट २०२५) –
गुरुनानक कॉलेज बल्लारपूरचे माजी विद्यार्थी संघटनेतर्फे स्थापन करण्यात आलेल्या गुरुनानक कॉलेज ग्लोबल फाउंडेशन बल्लारपूर तर्फे मोफत करिअर मार्गदर्शन कार्यक्रम व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा काल सोमवार २५ ऑगस्ट रोजी बल्लारपूर येथील राजे बल्लाळशाह नाट्यगृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून संस्थापक सचिव डीपर व संस्थापक अध्यक्ष साद फाउंडेशन पुणे प्रमुख हरीश बुटले उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना करिअर निवडीचे महत्त्व, बारावी विज्ञान शाखेनंतर उपलब्ध संधी, तसेच यशासाठी आवश्यक कौशल्य व तयारी याबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाचा शेकडो विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. कार्यक्रमात गुरुनानक कॉलेज ऑफ सायन्स बल्लारपूरचे एच.एस.सी., बी.एस्सी. व एम.एस्सी. टॉपर विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
- एच.एस.सी. टॉपर : प्रथम पियुष लालवाणी, द्वितीय आदित्य फुलझेले, तृतीय आन्या चंदेल
- बी.एस्सी. टॉपर : प्रथम वैष्णवी राजुरकर, द्वितीय तोशिबा कैथवास, तृतीय आयुष मामीडवार
- एम.एस्सी. टॉपर : प्रथम राशी शिंगाडे, द्वितीय ओंकार महंतो
विद्यार्थ्यांनी अनुभव व्यक्त करताना मेहनत, सातत्य व वेळेचे नियोजन हे यशाचे रहस्य असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन गुरुनानक कॉलेज ग्लोबल फाउंडेशन बल्लारपूरचे अध्यक्ष डॉ. विजय वाढई, सचिव नरेश मुंदडा, उपाध्यक्ष विरेंद्र आर्य, सहसचिव जितेंद्र जोगड, कोषाध्यक्ष डॉ. प्रफुल काटकर, तसेच कार्तिक वागदेव, युवराज बोबडे, अमोल गर्गेलवार, मनीषा जीवतोड़े, विजय दिकोंडावार, डॉ. शितल जांभूले, करुणा देवगडे, प्रणय विग्नेशवर यांच्या पुढाकाराने झाले.
या कार्यक्रमाला बी.आय.टी. कॉलेज बल्लारपूर, चंद्रपूर कॉलेज ऑफ फार्मसी चंद्रपूर, गुरुनानक कॉलेज ऑफ सायन्स बल्लारपूर, माउंट ज्युनिअर कॉलेज बल्लारपूर, एज्युकेशन पॉईंट बल्लारपूर, के.जी.एन. पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज बल्लारपूर, अडीटेक बायोटेक प्रा. लि. या संस्थांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशात स्वयंसेवक विद्यार्थ्यांचा मोलाचा वाटा होता सानिका वंधारे, श्रेष्ठा डांगे, ओमकार कवठे, सुजल नगराळे, नौशिना शेख, श्रेया सालवे. कार्यक्रम सुरळीत पार पाडल्याबद्दल आयोजकांनी त्यांचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचे संचालन नरेश मुंदडा यांनी तर आभार प्रदर्शन विरेंद्र आर्य यांनी केले.
#CareerGuidance #StudentSuccess #EducationMatters #InspiringYouth #AcademicExcellence #FutureLeaders #BallarpurEvents #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha #gurunanakcollageballarpur
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.