नवी दिल्लीमध्ये डॉ. बोरकुटे यांना नॅशनल, इंटरनॅशनल आणि भारत सम्मान अवार्ड
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
नवी दिल्ली (दि. २६ ऑगस्ट २०२५) –
चंद्रपूरचे ख्यातनाम सामाजिक कार्यकर्ते डॉ. रमेशकुमार बोरकुटे यांना समाजहितासाठी केलेल्या कार्याबद्दल एकाच वेळी तीन मानाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार बहाल करण्यात आले. नवी दिल्ली येथे झालेल्या भव्य सोहळ्यात नॅशनल एक्सीलेंस अवार्ड, इंटरनॅशनल प्रेस्टीज अवार्ड आणि भारत सम्मान अवार्ड 2025 या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.
- नॅशनल एक्सीलेंस अवार्ड – आंबेडकर ग्लोबल फाऊंडेशन दिल्ली तर्फे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते प्रदान.
- इंटरनॅशनल प्रेस्टीज अवार्ड – कितेश कॉर्पोरेट प्रॉडक्शन दिल्ली तर्फे पद्मश्री बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांच्या हस्ते.
- भारत सम्मान अवार्ड 2025 – ग्लोबल एक्सीलेंस फोरम दिल्ली तर्फे अरुणाचल प्रदेश सरकारचे मंत्री तागे टाकी यांच्या हस्ते.
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून दिल्ली सरकारचे कैबिनेट मंत्री कपिल मिश्रा, अरुणाचल प्रदेशचे कैबिनेट मंत्री न्यातो दुकम, खासदार डॉ. रवींद्र नारायण बेहरा, अरुणाचल प्रदेश मुख्यमंत्री सल्लागार डॉ. अलो लिबांग, दिल्ली पोलीस डीसीपी जितेंद्र मणि (आयपीएस), अरुणाचल प्रदेश आरोग्य सचिव सुश्री इरा सिंघल (आयएएस), दिग्दर्शक व ग्लोबल एक्सीलेंस फोरम अध्यक्ष डॉ. संदीप मारवाह, भाजप राष्ट्रीय प्रवक्ता गोपालकृष्ण अग्रवाल, आयसीएफएजे व कलिंग विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. जगन्नाथ पटनायक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन ग्लोबल एक्सीलेंस फोरमचे अध्यक्ष जितेंद्र रवी यांनी केले. हा अभिमानाचा सन्मान केवळ डॉ. रमेशकुमार बोरकुटे यांच्यासाठीच नव्हे, तर चंद्रपूर जिल्हा व महाराष्ट्रासाठी गौरवास्पद क्षण ठरला आहे.
#NationalExcellenceAward #InternationalPrestigeAward #BharatSamman2025 #DrRameshkumarBorkute #ChandrapurPride #SocialWorkRecognition #DelhiEvent #IndiaHonours #GlobalExcellence #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.