Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: दोन पिकअप वाहनांमधून जनावरांची सुटका
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दोन पिकअप वाहनांमधून जनावरांची सुटका १९ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त आमचा विदर्भ - दीपक शर्मा  चंद्रपूर (दि. ११ ऑगस्ट २०२५) -         गोंड...
दोन पिकअप वाहनांमधून जनावरांची सुटका
१९ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
चंद्रपूर (दि. ११ ऑगस्ट २०२५) -
        गोंडपिपरी पोलीस ठाणे हद्दीत गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी मोठी कारवाई करत दोन पिकअप वाहनांमधून कत्तलीसाठी नेत असलेले १० जनावरे (गौवंश) ताब्यात घेतली. ही कारवाई ११ ऑगस्ट २०२५ रोजी मौजा वढोली, नांदगाव - विठ्ठलवाडा रोडवर करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी नाकाबंदी करून दोन पिकअप वाहने थांबवून पंचासमक्ष तपासणी केली असता, वाहनांमध्ये कत्तलीकरीता जनावरे कोंबून नेत असल्याचे आढळले.

        या प्रकरणात आरोपी म्हणून मुफीद सरवर अली वय ३१, रा. वांकडी, जि. आसीफाबाद, तेलंगणा, रफीक हुसेन सयद वय ३२, रा. लक्कडकोट, समीर शमशेर खान वय २५, रा. वांकडी, जि. आसीफाबाद आणि महमुद अली रा. वांकडी, जि. आसीफाबाद यांच्याविरुद्ध गोंडपिपरी पोलीस ठाण्यात कलम ११ (१) (घ), (ङ), (च), (ज) प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, सहकलम ५ (अ), ९, ११ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, कलम ३२५, ३(५), ९ भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कारवाईत आरोपींकडून महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन (क्रमांक टीजी २०-टी ०४६५) आणि (एमएच ३४ बीझेड-८४३१) तसेच १० जनावरे आणि अन्य साहित्य असा एकूण १९ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

        ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि दीपक कांक्रेडवार, बलराम झाडोकार, पोउपनि विनोद भुरले, सुनिल गौरकार, पोहवा इमरान खान, सतिश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, किशोर वाकाटे, सुमीत बरडे, जयंत चुनारकर, चेतल गज्जवार, सुरेंद्र महतो, अजित, हिरालाल गुप्ता, प्रदीप, प्रफुल्ल ई. यांच्या पथकाने केली. पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत.

#PoliceAction #AnimalRescue #CrimeBranch #ChandrapurNews #IllegalCattleTransport #LawEnforcement #JusticeInAction #aamchavidarbha #vidarbha #chandrapurupdate #chandrapurian #chandrapur

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top