"आरोग्यधोक्यावर मनसे महिला सेनेची भूमिका ठाम"
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ११ ऑगस्ट २०२५) -
राजुरा शहरातील सोनिया नगर वॉर्डात नगर पालिकेचा घनकचरा प्रकल्प असल्याने स्थानिक नागरिकांना अस्वच्छता आणि आरोग्यधोक्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील सर्व वॉर्डांमधून जमा होणारा कचरा या प्रकल्पात आणून साठवला जातो. मात्र, या कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट न लावल्यामुळे तो सडून दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई किंवा नियोजन केले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या शहराध्यक्ष भावना लाडसे यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला इशारा दिला आहे की, सोनिया नगर येथील घनकचरा प्रकल्प तात्काळ शहराबाहेर हलविण्यात यावा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेतर्फे उग्र आंदोलन छेडले जाईल. भावना लाडसे यांनी स्पष्ट केले की, या आंदोलनामुळे शहरातील शांतता व सुव्यवस्था बिघडल्यास त्यास प्रशासन स्वतः जबाबदार राहील. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा हा प्रकार तातडीने थांबवून पर्यायी उपाययोजना करणे ही नगर पालिकेची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
#RajuraWasteIssue #SolidWasteCrisis #MNSWomenWing #CleanRajura #ShiftTheDumpYard #HealthOverPolitics #RajuraProtest #maharashtranavnirmanmahilasena #bhavnaladse #nagarparishadrajura #aamchavidarbha #vidarbha #chandrapurupdate #chandrapurian #chandrapur #rajuraupadate
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.