Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ''न समजलेले आई-बाप'' प्रा. वसंत हंकारे यांचे व्याख्यान
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजूरात माता, भगिनीं, मुले, माणसाना अश्रू अनावर सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्या कार्याचे कौतुक बघा व्हिडीओ आमचा विदर्भ - दीपक शर्मा राज...
राजूरात माता, भगिनीं, मुले, माणसाना अश्रू अनावर
सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्या कार्याचे कौतुक
बघा व्हिडीओ
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २२ ऑकटोबर २०२४) -
आईच्या खाद्यांला खांदा लावून शेतात राब राब राबतो तो बाप असतो, तूमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी स्वताचे फाटके कपडे घालेल पण तूम्हाला नवीन कपडे देईल तो बाप असतो, असे प्रतिपादन प्रसिध्द व्याख्याते वसंत हंकारे यांनी केले. आयोजक सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्या पुढाकाराने येथील स्वयंवर मंगल कार्यालयात प्रा.वसंत हंकारे यांच्या ''न समजलेले आई-बाप'' विषयावर व्याख्यान‎ आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे, चौधरी, धनंजय बोरडे, सुशील मडावी, किशोर निब्रड, पारखी, सुभाष हजारे, रामदास धानोरकर व इतर मान्यवर उपस्थित होते. 

वसंत हंकारे पुढे म्हणाले की, मूलींनो प्रेमाच्या खोट्या जाळ्यात अडकून स्वतःचे आयूष्य बरबाद करू नका, १५ ते २० वर्ष आपल्याला सांभाळलेले असते त्याच्या अन्नात प्रेम करून माती कालवू नका, आपले आई वडील समाजात ताठ मानेने फिरले पाहिजेत हि माझी मूलगी, हा माझा मूलगा असे आई वडीलांनी सागितले असे कतृत्व, तूमचे वागणे, जगणे असले पाहीजे, चूकीच्या वागण्याने आपला बाप अर्धमेला होतो, त्याला समाजात तोंड दाखवायला जागा रहात नाही असे वागू नका, राञ राञ आपला बाप आपल्यासाठी राबत असतो हे विसरू नका, आई वडीलासारखे प्रेम आपल्यावर कोणीही करू शकत नाही. कायम लक्षात ठेवा यावेळी मूलं. मूली, आई, वडील याच्यात भावनेचा बांधफूटला अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले, आपण किती तरी वेळा चूकीचे वागतो हे समजून आले, हंकारे सरांनी प्रत्येकांच्या डोळ्यात अंजन घातले अशी प्रत्येकांची भावना झाली होती.

यावेळी हंकारे यांनी या जगात आई वडिलांच्या पेक्षा जास्त प्रेम आपल्या मुला - मुलीवर कुणी करू शकत नाही, त्यामुळे जीव गेला तर बेहत्तर पण आपल्या बापाला मान खाली घालावी लागेल असे वागू नका, असे आवाहन त्यांनी केले. तसेच सोशल मीडिया मधील ओळखीला बळी पडून ऐन तरुणी अनेक 'चुका 'करून बसतात व त्याचे प्रायश्चित सर्वात जास्त समाज्यात व इतर ठिकाणी बाप नावाच्या व्यक्तीला द्यावे लागते, क्षणिक प्रलोभनाला बळी न पडता बुद्धीने व आर्थिकरित्या स्वावलंबी बना यासंदर्भातील विविध क्षेत्रातील उदाहरणे देत, बाप म्हणजे काय हे त्यांनी संवेदनशीलरित्या सांगितले. त्यांच्या या व्याख्यानासाठी आलेल्या अनेक महिला, मुली भावनाविवश झाल्या तर काहींनाअश्रू अनावर झाले.

सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्या पुढाकाराने  वसंत हंकारे यांचे ''न समजलेले आई-बाप'' या व्याख्यानाचे आयोजन स्वयंवर मंगल कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी राजुरा शहर तसेच परिसरातील विद्यार्थी, विद्यार्थीनी, महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari  #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul #Socialworker #BhushanPhuse #BhushanFuse #BhushanMadhukarraoFuse #VasantHankare #Lecture #Nasamajhleleaaibap

"The-Misunderstood-Parents"-Prof-Lecture-by-Vasant-Hankare

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top