Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ॲड. वामनराव चटप यांचा झंझावाती दौरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गावागावात होत आहे ह्दयस्पर्शी स्वागत आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. २० ऑकटोबर २०२४) -        शेतकरी संघटनेचे नेते ॲड. वामनराव चटप यांच...
गावागावात होत आहे ह्दयस्पर्शी स्वागत
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २० ऑकटोबर २०२४) -
       शेतकरी संघटनेचे नेते ॲड. वामनराव चटप यांचा संपुर्ण मतदारसंघात झंझावाती दौरा सुरू असून गावागावात नागरिक त्यांचे जोरदार स्वागत करीत आहेत. गोंडपिपरी व जिवती तालुक्यात झालेल्या अनेक सभेत "अब की बार किसान सरकार" चे नारे देण्यात आले. ग्रामीण नागरिकांनी या भेटीत आपले प्रश्न व समस्या मांडून त्यावर मार्ग काढण्यासाठी सहकार्याचे आश्वासन दिले. एका दिवसाच्या निर्णयाने पाच वर्षाचे वाटोळे होते, असेही मत काही गावकऱ्यांनी मांडले.

        राज्यात काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी आणि भाजपप्रणित महायुती हे दोन्ही आलटून पालटून सत्तेत येत आहेत, मात्र शेतकरी, युवक, महिला, विद्यार्थी यांचे प्रश्न काही सुटले नाहीत. या दोन्ही आघाड्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव दिले नाहीच मात्र सत्तेवर येताच शेतकरी विरोधी व उद्योगपतीधार्जिणे धोरण राबविले. यामुळे शेतकऱ्यांवर अनेक संकटे आली. आता या चक्रव्युहातून मार्ग काढण्यासाठी शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष, बच्चू कडू यांचा प्रहार, राजु शेट्टी यांची स्वाभीमानी शेतकरी संघटना, स्वराज्य संघटना व विदर्भ राज्य पक्षांची परिवर्तन महाशक्ती आघाडी निर्माण झाली आहे. आता ही आघाडी सर्व शेेतकरी, शेतमजूर, तरूण, महिला, व्यापारी, गरिब, आदीवासी, अनुसूचित जाती यांचे प्रश्न विधिमंडळात तडीस लावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करीत आहे. यापुर्वी या सर्व संघटनांनी नागरिकांचे व वंचित घटकांचे प्रश्न लावून धरून न्याय मिळवून देण्यासाठी विधीमंडळात व रस्त्यावर जोरदार संघर्ष केला आहे, ही पार्श्वभूमी लक्षात घेता पुन्हा विश्वासाचे नाते निर्माण व्हावे, अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

        यावेळी राजुरा विधानसभा क्षेत्रात तिन वेळा विजयी होऊन  विकासकामे करण्यात आघाडीवर असलेले ॲड.वामनराव चटप निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. निवडणूकीत पराभूत झाल्यावरही कायम ॲड.वामनराव चटप हे मतदारांच्या संपर्कात राहून सतत त्यांच्या अडीअडचणीला धावून गेले आहे. विविध आंदोलनाद्वारे जनतेचे ज्वलंत प्रश्न ऐरणीवर आणून आणि सरकार दरबारी नेऊन न्याय मिळवून देण्याचा अथक प्रयत्न केला आहे. सार्वजनिक बाब असो की वैयक्तिक, ॲड.चटप यांनी नागरिकांना विश्वासाने व सौजन्याने मदत करून आमदार नसतांनाही माजी आमदार म्हणून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे केले आहे. त्यामुळेच जनता गावागावात त्यांना समर्थन व्यक्त करीत आहे.

        ॲड.वामनराव चटप यांनी ग्रामीण भागात गाव, गुढे, वाड्यात प्रत्यक्ष जाऊन तेथील समस्या समजून तातडीने त्यावर मार्ग काढला आहे. सन १९९० मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यावर ॲड.चटप यांनी प्रत्येक गावात जाऊन रस्ते, पिण्याचे पाणी, जि.प. शाळा, शासकिय कार्यालयाच्या इमारती यांचा आढावा घेतला आणि एक ध्येय ठरवून पाचच वर्षात मोठ्या संख्येने विकासकामांचे जाळे विणले. गुढ्यावर रस्ते नसल्याने पायी जाऊन आढावा घेतला आणि त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले. यापूर्वी शासकिय निधीचे वितरण विदर्भ व मराठवाडा सोडून अन्य भागात मोठ्या प्रमाणात व्हायचे. मात्र ॲड. वामनराव चटप यांनी हा पायंडा विधानसभेत जोरदार प्रतिवाद करून आणि विविध संसदीय आयुधांचा वापर करून मोडून काढला. म्हणूनच राजुरा, गोंडपिपरी, कोरपना व जिवती तालुक्यात विकासाची मोठी गंगा वाहिली आणि आताही हीच कामे त्यांच्या विकासात्मक दृष्टीची साक्ष देत आहेत. मात्र गेल्या १५ वर्षात हे क्षेत्र बरेच मागे पडले आहे. कोणतेच उल्लेखनीय कार्य झाले नाही, याची जाणीव आता नागरिकांना झाली आहे. आता पुन्हा पुर्वी प्रमाणेच राजुरा क्षेत्राचा विकास व्हावा व शेतकऱ्यांना शेतमालाचे भाव मिळावे, यासाठी मनापासून लढणाऱ्या नेत्याने राजुरा क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करावे, असा आशावाद शहरी व ग्रामीण नागरिक व्यक्त करीत आहेत.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari  #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #Awarpur #kavthala #JivatiTaluka #nanda #korpana #WirurStation 

#DevelopmentofRajuraarea #AdvWamanraoChatap #Abkibaarkisansarkar #Agruelingtour #CongressledMahavikasAghadi #BJPledGrandAlliance #mahavikasaaghadi #mahayuti #ShetkariSanghtna #SwatantraBharatPaksha #Prahar #SwabhimaniShetkariSanghtna #RajuraAssemblyConstituency #Election2024

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top