वैद्यराज मेश्राम यांच्या कार्याची मंत्र्यांकडून माहिती
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १६ डिसेंबर २०२५) -
महाराष्ट्रातील पारंपरिक वैद्यक उपचार पद्धतीला मोठी दखल मिळाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील लोहारा गावात घडली असून महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रसाद लोडा यांनी दि. 13 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 7.30 वाजता वैद्यराज मनोहर कवडू मेश्राम यांच्या राहत्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेतल्याने सर्वत्र चर्चा रंगली आहे. या भेटीदरम्यान त्यांनी मेश्राम कुटुंबातील सदस्यांसोबत जवळपास अर्धा तास सविस्तर चर्चा केली. या भेटीवेळी कुटुंबातील सदस्य मुलगा मुकुल मेश्राम, मुलगी इशिका मेश्राम, सून रूपाली मेश्राम, नात पल्लवी मेश्राम तसेच पत्नी मंगलालाई मेश्राम उपस्थित होते. मंत्री मंगल प्रसाद लोडा यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत वैद्यराज मेश्राम यांच्या कार्याबाबत सखोल माहिती घेतली.
वैद्यराज मनोहर कवडूजी मेश्राम हे मागील 30 वर्षांपासून वनऔषधीच्या माध्यमातून विविध आजारांवर उपचार करत असून त्यांच्या उपचारपद्धतीमुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळत आहे. कॅन्सर, सिकलसेल, लकवा, मधुमेह, ब्लॉकेज वेन्स म्हणजेच दबलेल्या नसांचे आजार अशा गंभीर आजारांवर त्यांच्या वनऔषधी प्रभावी ठरत असल्याचा दावा अनेक रुग्णांकडून केला जात आहे.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आधुनिक वैद्यकशास्त्राचा मोठ्या प्रमाणात वापर होत असून रासायनिक औषधांवरील खर्चही प्रचंड वाढला आहे. तसेच रासायनिक फवारणी केलेले अन्नधान्य व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर आहारात समाविष्ट झाल्यामुळे कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत वनऔषधी उपचार पद्धती मानवाच्या शरीरावर कोणतेही दुष्परिणाम न करता प्रभावी ठरत असल्याचे वैद्यराज मेश्राम यांनी स्पष्ट केले.
या भेटीनंतर मंत्री मंगल प्रसाद लोडा यांचा गावातील नागरिकांशी परिचय व्हावा यासाठी गुरुदेव सेवा मेळ मंडळ लोहारा यांच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात गावकरी मंडळींनी भजन आणि कीर्तनाचा आस्वाद घेतला. मंत्री मंगल प्रसाद लोडा यांनीही या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदवत ग्रामीण संस्कृतीचा अनुभव घेतला. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये टीआरटीआयच्या माध्यमातून वनऔषधी व पारंपरिक उपचार पद्धतींचा प्रचार-प्रसार सुरू असून वैद्यराज मनोहर कवडू मेश्राम यांच्या कार्यामुळे या क्षेत्राला नवी ओळख मिळत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. मंत्री मंगल प्रसाद लोडा यांच्या या भेटीमुळे पारंपरिक वैद्यक पद्धतीला राजकीय व प्रशासकीय स्तरावर पाठबळ मिळणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.
#TraditionalMedicine #HerbalTreatment #Maharashtra #TribalMedicine #HealthAwareness #NaturalHealing #ManoharMeshram #MangalPrasadLodha #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.