राजुरा (25 ओक्टोबर 2024) -
विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच राजकीय वातावरण तापले आहे. सध्या विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक उमेदवार कागदपत्रे जमा करण्यात व फार्म भरण्याच्या तयारीत आहे. तर दुसरी कडे त्यांच्ये कार्यकर्ते सोशलमिडीया वर एकमेकांवर चिखलफेकीत गुंतलेल्ये असल्याचे दिसून येत आहे. अश्यातच सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी माजी आमदार शेतकरी नेते हे विद्यमान आमदारांचे वय खोटे सांगत आहे? जर विद्यमान आमदाराने खोटे शपथ पत्र दिले आहे तर माजी आमदार कोर्टात का गेले नाही? असा सवाल केला आहे. विद्यमान व माजी आमदारांनी सत्तरवी ओलांडली असून त्यांनी आता घरी नातवंडे खेळवावी. घराणेशाहीला बाजूला सारून नव्या पिढीतील त्यांच्या कार्यकर्त्यांना निवूडणुकीत सामोरे करून समाजात व राजकारणात आदर्श निर्माण करावा असा टोला सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी लगावला आहे. आलटून पालटून सत्ता आपल्या हातात ठेवणाऱ्या प्रस्थापित नेत्यांच्या राजकारणाला जनता आता कंटाळली असून मतदार आता यावेळेस नवीन दमदार चेहऱ्यास निवडून देणार असल्याची चर्चा विविध गाव-खेड्यात सुरु आहे.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul #Socialworker #BhushanPhuse #BhushanFuse #BhushanMadhukarraoFuse #Congrass #SwatantraBharatPaksha #VanchitBahujanAaghadi #BJP #AamAadamiParty #AssemblyElections2024
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.