Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जिल्ह्यात आज 57 उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा तालुक्यात 11 तर वरोरात 15 नामांकन दाखल आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. 28 ऑक्टोबर 2024) - महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडण...
राजुरा तालुक्यात 11 तर वरोरात 15 नामांकन दाखल
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. 28 ऑक्टोबर 2024) -
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी (दि.28) चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात एकूण 57 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले.

70 - राजुरा विधानसभा मतदारसंघात प्रिया बंडू खाडे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया), निनाद चंद्रप्रकाश बोरकर (अपक्ष), सुभाष रामचंद्र धोटे (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस), संजय यादवराव धोटे (भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष), चित्रलेखा कालिदास धंदरे (अपक्ष), सुदर्शन भगवान निमकर (भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष), देवराव विठोबा भोंगळे  (भारतीय जनता पार्टी), सचिन बापूराव भोयर (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), गजानन गोदरू पाटील जुमनाके (गोंडवाना गणतंत्र पार्टी),  प्रवीण रामराव कुमरे (बहुजन मुक्ती पार्टी) आणि वामनराव सदाशिव चटप (स्वतंत्र भारत पक्ष) यांनी नामांकन अर्ज दाखल केले.

71 - चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात सुरेश मल्हारी पाईकराव (अपक्ष), राजेश भीमराव घुटके (अपक्ष), जोरगेवार किशोर गजानन (भारतीय जनता पार्टी), प्रियदर्शन अजय इंगळे (राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व अपक्ष), प्रवीण नानाजी पडवेकर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), मिलिंद प्रल्हाद दहिवले (केंद्रीय मानवाधिकार संगठन व  अपक्ष), ज्ञानेश्वर एकनाथ नगराळे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-अ), भानेश राजम मातंगी (अपक्ष) आणि                     भुवनेश्वर पद्माकर निमगडे (अपक्ष) यांचा समावेश आहे.

72- बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात किशोर बंडू उईके (अपक्ष), संजय नीलकंठ गावंडे  (अपक्ष), रामराव ओंकार चव्हाण (अपक्ष), निशा शीतलकुमार धोंगडे (अपक्ष), राजू देवीदास जांभुळे (अपक्ष), सतीश मुरलीधर मालेकर (वंचित बहुजन आघाडी), कुणाल पुरुषोत्तम गायकवाड (अपक्ष), सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार (भरतीय जनता पार्टी), अरुण देवीदास कांबळे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिर्फॉमिस्ट) आणि अभिलाषा राकेश गावतुरे (अपक्ष) यांचा समावेश आहे.

73 - ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघात विनोद अंबादास नवघडे (अपक्ष), कृष्णा सहारे (भारतीय जनता पार्टी), वसंत वर्जूर्कर (अपक्ष), अनंता भोयर (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक).

74 - चिमूर विधानसभा मतदारसंघात अरविंद आत्माराम चांदेकर (वंचित बहुजन आघाडी), अनिल अंबादास घोंगळे (अपक्ष), सतीश वारजुकर (भारतीय 

राष्ट्रीय काँग्रेस), हेमंत गजानन दांडेकर (अपक्ष), धनंजय मुंगले (अपक्ष), कैलास श्रीहरी बोरकर (अपक्ष), प्रकाश नान्हे (अपक्ष), डॉ. हेमंत सुखदेव उरकुडे (अपक्ष).

75 – वरोरा विधानसभा मतदारसंघात प्रवीण सुरेश काकडे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), विनोद कवडूजी खोब्रागडे (अपक्ष), अमोल दिलीप बावणे (अपक्ष), राजू मारोती गायकवाड. (अपक्ष), जयवंत नथ्थुजी काकडे (अपक्ष), जयंत मोरेश्वर टेमुर्डे (अपक्ष), अहेतेशाम सदाकत अली (प्रहार जनशक्ती), श्रीकृष्ण धुमदेव दडमल (अपक्ष), रंजना मनोहर पारशिवे (अपक्ष), करण संजय देवतळे (भारतीय जनता पार्टी), मुकेश मनोज जिवतोडे (शिवसेना उबाठा आणि अपक्ष), चेतन गजानन खुटेमाटे (अपक्ष), महेश पंढरीनाथ ठेंगणे (अपक्ष), मुनेश्वर बापूराव बदखल (अपक्ष), रमेश महादेवराव राजुरकर (भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष) यांनी नामांकन दाखल केले.

महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे.  उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर असून, 30 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत 4 नोव्हेंबर पर्यंत आहे.
#MaharashtraAssemblyGeneralElection2024 #ChandrapurDist #SixassemblyconstituenciesinChandrapurdistrict

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top