Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जागतिक आदिवासी दिन सांस्कृतिक अभिमानाचा दिवस – आमदार किशोर जोरगेवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जागतिक आदिवासी दिन सांस्कृतिक अभिमानाचा दिवस – आमदार किशोर जोरगेवार जलनगर वार्डात जागतिक आदिवासी दिनाचा उत्सव आणि सौंदर्यीकरण भूमिपूजन आमचा ...
जागतिक आदिवासी दिन सांस्कृतिक अभिमानाचा दिवस – आमदार किशोर जोरगेवार
जलनगर वार्डात जागतिक आदिवासी दिनाचा उत्सव आणि सौंदर्यीकरण भूमिपूजन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
चंद्रपूर (दि. ११ ऑगस्ट २०२५) -
        चंद्रपूरातील जलनगर वार्ड येथे जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक आणि विकासात्मक उपक्रमांचा संगम पाहायला मिळाला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार (MLA Kishore Jorgewar) यांच्या हस्ते सौंदर्यीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

        आमदार किशोर जोरगेवार यांनी भाषणात सांगितले की, जागतिक आदिवासी दिन हा केवळ उत्सवाचा दिवस नसून आदिवासी समाजाच्या शौर्य, परंपरा, संस्कृती आणि योगदानाची आठवण करून देणारा प्रेरणादायी क्षण आहे. आदिवासी समाज हा भारताच्या आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा एक तेजस्वी भाग असून हा दिवस सांस्कृतिक अभिमानाचा दिवस म्हणून साजरा करावा.

      त्यांनी पुढे म्हटले की, आदिवासी समाजाची लोकपरंपरा, नृत्य, गाणी आणि सण-उत्सव हे केवळ कलात्मक अभिव्यक्ती नसून निसर्गाशी असलेल्या घट्ट नात्याचे प्रतीक आहेत. ही जीवनशैली पर्यावरण संवर्धन, सुसंवाद आणि सहजीवनाचा संदेश देते. आधुनिक युगात विकासाच्या वाटचालीसोबत आदिवासी संस्कृतीचे संवर्धन करणे ही सामूहिक जबाबदारी आहे. शिक्षण, रोजगार आणि आरोग्य क्षेत्रात प्रगती साधताना आपल्या सांस्कृतिक मुळांचा सन्मान राखणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

        जलनगर वार्डात आयोजित आदिवासी समाज मेळाव्यात पारंपरिक वेशभूषेत शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेली नृत्ये प्रेक्षकांनी कौतुकाने पाहिली. या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार (Subhash Kasangottuwar), महिला शहर अध्यक्षा छबु वैरागडे, माजी नगरसेविका शीतल आश्राम, पुष्पा उराडे, राकेश बोमनवार, अनिल सुरपाम, किसन सुरपाम यांची उपस्थिती होती.

        आमदार किशोर जोरगेवार यांनी सौंदर्यीकरण विकास कामाचे भूमिपूजन करताना सांगितले की, भौतिक विकास आणि सांस्कृतिक जतन या दोन्ही दिशांना एकत्रितपणे चालणे हेच खरे समाजकल्याण आहे. कार्यक्रमाला स्थानिक नागरिक आणि समाजबंधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

#WorldTribalDay #CulturalPride #TribalHeritage #TraditionAndDevelopment #NatureAndCulture #CommunityUnity #SustainableProgress #MLA #kishorejorgewar #subhashkasangottuwar #chhabuwairagade #aamchavidarbha #vidarbha #chandrapurupdate #chandrapurian #chandrapur

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top