अष्टभुजा वार्डातील युवकाचा खून; अवघ्या दोन तासांत चौघांना अटक
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २ ऑगस्ट २०२५) -
अष्टभुजा वार्डातील युवकाचा मध्यरात्रीच्या सुमारास खून झाल्याच्या घटनेत अवघ्या दोन तासांत गुन्ह्यातील चार आरोपींना अटक करण्यात आली. रामनगर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांच्या संयुक्त पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली. दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ३ वाजताच्या सुमारास रामनगर पोलीस स्टेशन येथे माहिती प्राप्त झाली की अष्टभुजा वार्ड चंद्रपूर येथील छोटू उर्फ मृणाल हेडाऊ वय ३५ वर्ष याचा मारहाण करून खून करण्यात आला आहे. या घटनेवरून रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६२१/२०२५, कलम १०३(१), ३३३, ३(५) भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी विशेष पथक तयार करण्यात आले. पोलीस स्टेशन रामनगर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि अंमलदार घटनास्थळी दाखल होऊन गोपनीय तपास सुरू केला. फक्त दोन तासांतच खून करणाऱ्या सुमोहित उर्फ गोलू मेश्राम वय २६ वर्ष, टिल्लू उर्फ अनिल निकोडे वय ३० वर्ष, सुलतान अली अली वय ३० वर्ष, बबलू सय्यद वय ३८ वर्ष सर्व राहणार चंद्रपूर यांना अटक करण्यात आली. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत लभाने, पोलीस स्टेशन रामनगर हे करीत आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पार पडली.
सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कॉक्रेडवार, देवाजी नरोटे, हनुमान उगले, निलेश वाघमारे, प्रशांत लभाने, शिवाजी नागवे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, हिराचंद गव्हारे, अतुल राठोड, पोलीस अंमलदार गजानन नागरे, जितेंद्र आकरे, लालु यादव, शरद कुडे, आनंद खरात, विनोद यादव, बाबा नैताम, मनिषा मोरे, रजनीकांत पुठठावार, इंदल राठोड, संदीप कामडी, पंकज ठोंबरे, प्रफुल्ल पुप्पलवार, रविकुमार ठेंगळे, हिरा गुप्ता, संदेश सोनारकर, प्रशांत झाडे, सुरेश कुरेवार, रुपेश घोरपडे, ब्ल्यूटी साखरे यांनी केली आहे.
#ChandrapurCrime #RapidJustice #MurderCaseSolved #PoliceAction #RamNagarPolice #CrimeInvestigation #LocalCrimeBranch #JusticeForChhotu #ChandrapurUpdates #CriminalsCaught #aamchavidarbha #vidarbha #chandrapurupdate #chandrapurian #chandrapur
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.