Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राजकारणात निष्ठा टिकवणाऱ्या नेतृत्वाचे काँग्रेसतर्फे सन्मान
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजकारणात निष्ठा टिकवणाऱ्या नेतृत्वाचे काँग्रेसतर्फे सन्मान बल्लारपूरमध्ये घनश्याम मुलचंदानी यांचा सत्कार आमचा विदर्भ - राजेश अरोरा बल्लारपू...
राजकारणात निष्ठा टिकवणाऱ्या नेतृत्वाचे काँग्रेसतर्फे सन्मान
बल्लारपूरमध्ये घनश्याम मुलचंदानी यांचा सत्कार
आमचा विदर्भ - राजेश अरोरा
बल्लारपूर (दि. २ ऑगस्ट २०२५) -
       महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नवनियुक्त सचिव घनश्याम मुलचंदानी यांचा नागरी सत्कार समारंभ रविवारी बल्लारपूर येथील शासकीय विश्रामगृहात शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात घनश्याम मुलचंदानी यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या आदरातिथ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ते ऊर्जा देणारे असल्याचे मत व्यक्त केले. ते म्हणाले की, “भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने अनेक चढ-उतार पाहिले, परंतु आजही जनतेचा विश्वास काँग्रेसवर आहे. काही लोक सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे पक्ष सोडून गेले, मात्र माझी चार दशके काँग्रेस सोबत निष्ठेची वाटचाल राहिली असून त्याचमुळे मला आज पक्षाने राज्यपातळीवर संधी दिली आहे.”

        या कार्यक्रमात मंचावर प्रदेश सचिव घनश्याम मुलचंदानी यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष डॉ. रजनी हजारे, मध्यवर्ती बँकेचे संचालक डॉ. अनिल वाढई, शहर काँग्रेस अध्यक्ष देवेंद्र आर्य, तालुका काँग्रेस अध्यक्ष गोविंदा उपरे, माजी अध्यक्ष अब्दुल करीम शेख, माजी नगराध्यक्ष दिलीप माकोडे, सुनंदा आत्राम, छाया मडावी, अफसाना सय्यद, डेव्हीड कामपेल्ली, नरसिंह रेब्बावार व प्राणेश अमराज यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर काँग्रेस अध्यक्ष देवेंद्र आर्य यांनी केले. सूत्रसंचालन नरेश मुदंडा यांनी केले. आभार प्रदर्शन ॲड. पवन मेश्राम यांनी केले.

        या सत्कार समारंभात विविध सामाजिक संस्थांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमात कासिम शेख, नरेश आनंद, विवेक खूटेमाटे, करण कामटे, मंगेश बावणे, मेहमूद पठान, वासुदेव येरपुडे, नरेश बुरांडे, शिवचरण राजभर, प्रीतम पाटील, दीपक धोपटे, नाना बुंदेल, महेश सदाला, राजू मारमवार, कैलाश धानोरकार, सुभाष दिवसे, रमेश जक्कू, रोहन कलंबे, पिंकु हरडे तसेच शहर व ग्रामीण काँग्रेस, महिला काँग्रेस, युवा काँग्रेस, सेवादल, एनएसयूआय व इंटकचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्काराच्या निमित्ताने घनश्याम मुलचंदानी यांच्याशी कार्यकर्त्यांनी संवाद साधला आणि पुढील कार्यकाळात पक्ष संघटन बळकट करण्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या.

#CongressLeader #GhanshyamMulchandani #BallarpurCongress #CongressUnity #LeadershipMatters #PoliticalJourney #PublicHonor #CongressWorkers #MaharashtraPolitics #GrassrootPower #devendraarya #ballarpur #aamchavidarbha #vidarbha #chandrapurupdate #chandrapurian #chandrapur

Advertisement

Next
This is the most recent post.
Previous
थोडे जुने पोस्ट

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top