पोलिसांची ठोस कारवाई, सराईत गुन्हेगार MPDA अंतर्गत गजाआड
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. 02 ऑगस्ट 2025) -
जिल्ह्यात चोरी, जबरी चोरी, दरोडा, खून, खूनाचा प्रयत्न, बलात्कार, अवैध धंदे, हत्यार बाळगणे अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर MPDA कायद्यांतर्गत कारवाई सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून पोलीस स्टेशन रामनगर व बल्लारपूर येथे एकूण १५ गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला विनित नानाजी तावाडे, वय २८ वर्ष, रा. बापट नगर याच्यावर MPDA अंतर्गत कडक कारवाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील अशा धोकादायक प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर प्रतिबंध घालण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवली जात आहे. याच अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या देखरेखीखाली पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांनी विनित तावाडे याच्यावर MPDA कायद्यानुसार प्रस्ताव तयार केला.
उपरोक्त प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर झाल्यानंतर पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी संबंधित दस्तऐवजांची पडताळणी केली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खरसान, पोलीस स्टेशन कोठारी यांच्या माध्यमातून अंतिम प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आला. दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांनी MPDA कायद्यांतर्गत विनित नानाजी तावाडे यास तात्काळ स्थानबद्ध करण्याचा आदेश जारी केला. आदेश प्राप्त होताच संबंधित आरोपीस त्वरित अटक करून जिल्हा कारागृह, चंद्रपूर येथे स्थानबद्ध करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खरसान, पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे, पोहवा संजय देशवाले, पोहवा अरुण खारकर, पोअं. परवेज शेख, पोअं. अनिल जमकात, मपोहवा मनिषा मोरे, मपोअं ब्युल्टी साखरे (पो.स्टे. रामनगर) आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने संयुक्तपणे केली.
#ChandrapurPolice #MPDAAction #CriminalBehindBars #LawAndOrder #ChandrapurCrimeControl #FearlessChandrapur #MPDA #PoliceAction #CrimeFreeChandrapur #aamchavidarbha #vidarbha #chandrapurupdate #chandrapurian #chandrapur
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.