प्रॉपर्टी व्यवहार आता अधिक सुकर – नागरिकांसाठी मदतीचे नवे दालन
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (ता. ३ ऑगस्ट २०२५) -
राजुरा तालुका जय शिवराय प्रॉपर्टी डीलर वेलफेअर असोसिएशनच्या नव्याने स्थापन झालेल्या कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच राजुरा येथे उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून आमदार देवराव भोंगळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. मुरलीधरराव देवाळकर होते. उद्घाटन प्रसंगी विशेष अतिथी म्हणून उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक जाधव, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अविनाश जाधव, माथरा खामोनाचे सरपंच हरिभाऊ झाडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन पिपरे, माजी जिल्हा परिषद सभापती सुनील उरकूडे, प्रतिष्ठित व्यापारी बंडूभाऊ माणूसमारे, सोमेश्वर आईटलावार, महमूदभाई मुसा, बापूजी धोटे, वामन तुराणकर, सुरेश रागीट, दिलीप गिरसावळे, विलास वडस्कर, सचिन भोयर, पत्रकार संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार प्रा. भिमय्या बोर्डेवार, श्रीकृष्ण गोरे यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना शेती, प्लॉट, घर खरेदी-विक्रीसाठी आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य मिळणार असल्याचे असोसिएशनचे पदाधिकारी यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमास राजुरा तालुका जय शिवराय प्रॉपर्टी डीलर वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष एकनाथ खडसे, सचिव विजय सातपुते, उपाध्यक्ष बालाजी लिपटे, सहसचिव उमेश मार्केट, कोषाध्यक्ष राजकुमार चौधरी, सदस्य नारायण पोटे, रमेश निमकर, अमोल गिरसावडे, राजेंद्र जगताप, रुपेश गिरसावडे, विकास पावडे, विनोद बनकर, विलास लखमापूर, आनंदराव वडस्कर, विनोद देवाळकर, बबलू पठाण, जाकीर भाई, छोटूलाल सोमलकर, वसंता वडस्कर, संजय पुरवटकर, मारुती बावणे, शशिकांत महाडोळे, शंकर झाडे, संजय भुजाडे, नंदू बुटले, नगराळे, राजकुमार ठाकूर, सुधाकर चांदेकर, मंगेश गुरुनुले, जुगल तिवारी, नवनाथ ठक, आक्रोश जुलमे, दीपक मगशेट्टीवार, अविनाश काळे, नितीन विधाते आणि इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. उपस्थित मान्यवरांनी असोसिएशनच्या कार्याची प्रशंसा करत भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
#RajuraNews #PropertyDealerWelfare #JayShivrayAssociation #RealEstateSupport #RajuraUpdates #CommunityInitiative #PropertyGuidanceRajura #aamchavidarbha #vidarbha #chandrapurupdate #chandrapurian #chandrapur
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.