नागभीड तालुक्यात महसूल सप्ताहात राबविले जाणार अभिनव उपक्रम
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
नागभीड (चंद्रपूर), (ता. ३ ऑगस्ट २०२५) -
राज्य शासनाच्या निर्देशानुसार 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन तर 1 ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. नागभीड तालुक्यात या सप्ताहानिमित्त प्रशासनाच्या वतीने विविध अभिनव उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महसूल सप्ताहाचा शुभारंभ (Chimur Assembly Constituency) चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तिकुमार ऊर्फ बंटी भांगडीया (MLA Kirtikumar alias Bunty Bhangadia) यांच्या हस्ते नागभीड तहसील कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला. या प्रसंगी ब्रम्हपुरी उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, तहसीलदार प्रताप वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पोलीस निरीक्षक, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, कार्यालयीन कर्मचारी, कोतवाल व विविध योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात आमदार बंटी भांगडीया यांनी (Revenue week) महसूल सप्ताहाच्या उपक्रमांचे कौतुक करत नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, प्रशासन जनतेपर्यंत थेट पोहोचण्यासाठी जी पावले उचलत आहे ती स्वागतार्ह असून या सप्ताहात सुरू होणाऱ्या उपक्रमांमुळे लोकसहभाग वाढेल. प्रास्ताविक करताना तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी सांगितले की, महसूलमंत्री यांच्या संकल्पनेतून हा सप्ताह साजरा होत असून नागभीड तालुक्यात सप्ताह कालावधीत -
- तलाठी डिजिटल डायरी
- महसूल कामकाजासाठी डिजिटल पंचनामा
- दर शुक्रवारी सरपंच व पोलीस पाटलांशी महसूल कक्षातून व्हर्च्युअल संपर्क
- कर्मचारी मासिक मूल्यांकनासाठी रेटिंग सिस्टीम
- शासकीय जमिनी संदर्भात ‘भुमी साक्षरता अभियान’
उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमांमुळे महसूल विभागाचे काम अधिक पारदर्शक आणि परिणामकारक होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात विविध लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. यामध्ये लक्ष्मीमुक्ती, अपाक, नोंद कमी वर्ग 2 ते वर्ग 1, शिधापत्रिका, ॲग्रीस्टॅक, प्रधानमंत्री किसान योजना, नैसर्गिक आपत्ती अनुदान, सामाजिक अर्थसहाय्य वाटप तसेच महिला व बालकल्याण आणि कृषी विभागाच्या योजनांचा समावेश होता. कार्यक्रमाचे संचालन मंडळ अधिकारी बोड्डावार यांनी केले आणि उपस्थितांचे आभार मानले.
#NagbhidRevenueWeek #DigitalGovernance #PeopleCentricAdministration #BhumiLiteracyCampaign #RevenueInitiatives2025 #TransparentGovernance #PublicWelfareWeek #NagbhidUpdates #ChandrapurDistrictNews #KirtikumarrBhangediya #BuntyBhangadia
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.