गुणवत्ता आणि कर्तव्यपरायणतेचा संगम
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 02 ऑगस्ट 2025) -
शाळेचा मुख्याध्यापक ध्येयवादी आणि कार्यकुशल असेल तर शाळा त्या नेतृत्वाखाली प्रगतीच्या वाटेवर वाटचाल करते. कमी कालावधी मिळूनही शाळेची शिस्त, गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कायम राखणाऱ्या मुख्याध्यापक देविदास भोयर (Principal Devidas Bhoyar) यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी स्थानिक शिवाजी हायस्कूल (Shivaji High School) येथे दिनांक 31 जुलै रोजी सेवानिवृत्ती व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. (Retirement and felicitation of meritorious students)
कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुधाकर कुंदोजवार (Sudhakar Kundojwar) उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात देविदास भोयर यांच्या कार्यशैलीचे आणि नेतृत्वगुणांचे कौतुक करताना सांगितले की, इंग्रजी माध्यमांकडे आकर्षण असतानाही शिवाजी हायस्कूलने आपल्या गुणवत्तेने स्थान टिकवले, त्याचे सर्व श्रेय मुख्याध्यापक देविदास भोयर यांनाच जाते. सेवानिवृत्त मुख्याध्यापक देविदास भोयर आणि शिपाई अब्दुल कदिर कुरेशी यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सपत्नीक सन्मान करण्यात आला. यावेळी दहावी परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष माजी आमदार अँड. संजय धोटे, (Ex MLA Adv. Sanjay Dhote) सचिव अविनाश जाधव (Avinash Jadhav), सहसचिव प्राचार्य दौलत भोंगळे (Principal Daulat Bhongale), साजिद हुसेन बियाबानी, श्रीधरराव गोडे, दत्तात्रय योगीनवार, प्राचार्य संभाजी वारकड (Principal Sambhaji Warkad), संजय गोखरे, विश्वेश्वर मडावी, रामेश्वर डोर्लीकर, पुंडलिक उराडे, केवलराम डांगे, प्रभाकर बोभाटे, मुरलीधर श्रीकोंडावार, डोमेश्वर बोंडे, गजानन खामनकर, संतोष कुंदोजवार, बी.एम. गोहोकार व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन खामनकर यांनी केले. संचालन अमरदीप वनकर यांनी तर आभार प्रदर्शन एस.जी. गेडाम यांनी केले. सांस्कृतिक विभागातर्फे नृत्य व गीत सादर करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् गीताने झाली. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#TeacherRetirement #SchoolFarewell #ShivajiSchoolRajura #EducationLeadership #StudentAchievement #RespectAndGratitude #InspirationalFarewell #ChandrapurEvents #PrincipalDevidasBhoyar #SudhakarKundojwar #ShivajiHighSchoolRajura #Retirementandfelicitationofmeritoriousstudents #ExMLA #AdvSanjayDhote #AvinashJadhav #Principal #DaulatBhongale #PrincipalSambhajiWarkad #aamchavidarbha #vidarbha #chandrapurupdate #chandrapurian #chandrapur
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.