दिपक धानोरकर व राजकुमार जुलमे यांचा सन्मानसोहळा भावनांनी ओथंबला
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 02 ऑगस्ट 2025) -
दिनांक 1 ऑगस्ट रोजी स्वामी विवेकानंद आश्रमशाळा किरमिरी (Swami Vivekananda Ashram School Kirmiri) येथे प्राथमिक मुख्याध्यापक दिपक गुलाबराव धानोरकर आणि वसतिगृह कर्मचारी राजकुमार जुलमे यांचा सेवानिवृत्ती सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार अँड. वामनराव चटप (Ex MLA Adv. Wamanrao Chatap) उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून सौ. वंदनाताई चटप, संस्थेचे कोषाध्यक्ष आशुतोष चटप, माजी सरपंच ताजने पाटील, उपसरपंच स्विटी डोंगरे, सत्कारमूर्ती दिपक धानोरकर आणि राजकुमार जुलमे सपत्निक उपस्थित होते.
संस्थेच्या वतीने अँड. वामनराव चटप, सौ. वंदनाताई चटप आणि आशुतोष चटप यांच्याकडून सत्कारमूर्तींना शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. याशिवाय, अनुदानित आदिवासी संघटना चंद्रपूरचे पदाधिकारी प्रमोद साळवे, मनोज आत्राम आणि संतोष केशेट्टीवार यांनीही यथोचित सत्कार केला.शाळेतील माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक मुख्याध्यापक झाडे यांनी केले. सूत्रसंचालन तलांडे यांनी केले. अँड. वामनराव चटप यांनी दिपक धानोरकर (Principal Deepak Gulabrao Dhanorkar) यांच्या 31 वर्षांच्या सेवाकाळातील कार्याचा आढावा घेतला. आशुतोष चटप यांनी धानोरकर यांनी प्रतिकूल परिस्थितीतून शाळेचा दर्जा उंचावण्यात दिलेले योगदान अधोरेखित केले. या प्रसंगी निखाडे, साळवे, पिंपळशेंडे, स्त्री अधीक्षिका जोगी, उईके, रामटेके यांनी मनोगते व्यक्त केली. भगत यांनी सुमधुर गीत सादर करून वातावरण भारावून टाकले. आभार प्रदर्शनही भगत यांनीच केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता गोहने, ठाकरे, कावडकर बाबू, विशाल धानोरकर, लडके, आमने, कांबळे, वाढई, मलगुलवार, भोयर, देवगडे, आडे, राऊत यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
#RetirementCelebration #DedicatedService #SwamiVivekanandSchool #kismiri #TeacherTribute #ChandrapurEvents #GratitudeCeremony #FarewellWithRespect #KirmiriSchoolNews #aamchavidarbha #vidarbha #chandrapurupdate #chandrapurian #chandrapur #advwamanraochatap #deepakdhanorkar
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.