Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: संघ मुख्यालयावर आत्मघाती हल्ल्याचा होता डाव
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
संघ मुख्यालयावर आत्मघाती हल्ल्याचा होता डाव जैशच्या दहशतवाद्याला पीओकेतून मिळत होते दिशानिर्देश आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स नागपूर जैश-ए-...

  • संघ मुख्यालयावर आत्मघाती हल्ल्याचा होता डाव
  • जैशच्या दहशतवाद्याला पीओकेतून मिळत होते दिशानिर्देश
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
नागपूर
जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याकडून संघ मुख्यालय आणि हेडगेवार स्मृती मंदिराची रेकी करण्यात आल्याच्या वत्ताने देशभरातील सुरक्षा संस्थांना सतर्क केले आहे. दरम्यान माहिती मिळाली आहे की, दहशतवादी संघटना संघ मुख्यालय आणि स्मृती मंदिरात आत्मघाती हल्ला करण्याच्या तयारीत होती. रेकी करण्यासाठी आलेल्या जैशच्या दहशतवाद्याला पीओकेतून दिशा-निर्देश मिळत होते. मात्र ज्या दहशतवाद्याला रेकी करण्यासाठी नागपुरात पाठविण्यात आले होते, तो आपले काम योग्यरित्या करू शकला नाही. गेल्या महिन्यात तो काश्मीरमध्ये पकडल्या गेला. रईस अहमद शेख असादुल्ला शेख (26) रा. अवंतीपुरा असे अटकेतील दहशतवाद्याचे नाव आहे. तो गत एक वर्षापासून जैशचा ऑपरेशनल कमांडर उमरच्या संपर्कात होता. नवीन चेहरा असल्यामुळे ओमरने त्याची संघ मुख्यालय आणि हेडगेवार भवनची रेकी करण्यासाठी निवड केली होती. 13 जुलैला तो काश्मिरातून विमानाने मुंबई आणि तेथून नागपूरला आला. ओमरने त्याला नागपूरच्या स्लीपर सेलमध्ये कार करणाऱ्या एका व्यक्तीचा नंबर दिला होता. त्याच्या राहण्याखान्याची व्यवस्था आणि संघ बिल्डिंग दाखविण्याचे काम हाच व्यक्ती करणार होता. रईस नागपूरला पोहोचला, मात्र त्या व्यक्तीने मदत करण्यास नकार दिला. अखेर रईस सीताबर्डीच्या एका हॉटेलमध्ये थांबला. रईस घाबरलेला होता, मात्र ओमरने त्याला मदतीचे आश्वासन दिले.

जम्मू-काश्मीर पोलिसांनी ग्रेनेडसह पकडले
जम्मू-काश्मीर पोलिस आणि गुप्तचर संस्था ओमरवर नजर ठेवून होते. कॉल डिटेल्सवरून तो रईसच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली. रईसवरही नजर ठेवण्यात आली आणि 20 डिसेंबरला अवंतीपुरा येथील एका घरावर धाड टाकून त्याला अटक करण्यात आली. झडतीमध्ये रईसजवळ एक हॅण्ड ग्रेनेडही मिळाला. त्याची सखोल चौकशी करण्यात आली. त्याने व्हॉट्सअॅपवर ओमरशी झालेले बोलणे आणि चॅटिंग डिलीट केली होती. सर्व मॅसेज रिट्रीव्ह केल्यावर ओमरला त्याने पाठविलेला हेडगेवार भवनाचा व्हीडिओ आणि फोटो दिसले. नागपूर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.

संयुक्त पथकाने केली विचारपूस
माहिती मिळताच गुन्हे शाखेचे डीसीपी चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वात एक संयुक्त पथक काश्मीरला पोहोचले.या पथकात एटीएस आणि गुप्तचर विभागाचे अधिकारीही होते. दोन दिवसांपर्यंत रईसची विचारपूस करण्यात आली.यात त्याने पोलिसांना आपल्या नागपुर दौऱ्याची सविस्तर माहिती दिली.या आधारावर नागपूर पोलिसांनी कोतवाली ठाण्यात रईसविरुद्ध यूएपीए अॅक्टसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला. सध्या तो जम्मू काश्मीर पोलिसांच्या ताब्यात आहे. लवकरच त्याला नागपूरला आणले जाईल.

शहर पोलिस आधीच होते सतर्क
वरिष्ठ अधिकाऱ्यांनुसार, रईसच्या गतिविधीची माहिती शहर पोलिसांना आधीच मिळालेली होती. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी फोर्स वनच्या कमांडोंसह सीआयएसएफ आणि शहर पोलिसांनी मॉक ड्रीलही केली होती. रईसने काही गोपनीय माहितीही पोलिसांना दिली आहे.या पार्श्वभूमीवर गुरुवारी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी संघ मख्यालय आणि हेडगेवार भवनच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला होता. पोलिस आयुक्तांनी सांगितले की, नागपूर पोलिस कोणत्याही परिस्थितीशी निपटण्यासाठी तयार आहेत.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top