Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: श्रद्धा आणि परंपरेच्या उत्सवात गुन्हेगारीची कलमं अन्यायकारक - सुरज ठाकरे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गणेश मंडळांवरील गुन्हे मागे घ्या; अन्यथा न्यायालयीन लढा राजुरा शहरात ७ गणेश मंडळांविरोधात दाखल गुन्ह्यांवर वादंग पत्रकार परिषदेत सुरज ठाकरे ...
गणेश मंडळांवरील गुन्हे मागे घ्या; अन्यथा न्यायालयीन लढा
राजुरा शहरात ७ गणेश मंडळांविरोधात दाखल गुन्ह्यांवर वादंग
पत्रकार परिषदेत सुरज ठाकरे यांचा पोलीस प्रशासनाला इशारा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. २१ सप्टेंबर २०२५) -
        राजुरा शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत ७ गणेश मंडळांनी रात्री १० नंतर साऊंड सिस्टीम वाजविल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेले गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत, अन्यथा उच्च न्यायालयात जाऊन न्यायलयीन लढा देऊ, असा इशारा काँग्रेसचे कामगार नेते तसेच जयभवानी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांनी दिला आहे. ते राजुरा तालुका पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत उमेश गोरे, भुषण बानकर, रतन पचारे, अँड. चंद्रशेखर चांदेकर यांच्यासह ज्या सातही गणेश मंडळांवर गुन्हे दाखल झाले, त्या मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

📌 प्रकरणाचे कारण
        दिनांक ७ सप्टेंबर २०२५ रोजी राजुरा शहरात मुख्य सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात पार पडली. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार रात्री १० वाजल्यानंतर ध्वनीवर्धक वाजवणे बंदी असताना, खालील मंडळांनी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे –
  • बालवीर गणेश मंडळ
  • शिवपुत्र गणेश मंडळ
  • श्री साई समाज गणेश मंडळ (राजीव गांधी चौक)
  • नेहरू चौक गणेश मंडळ
  • राणा वार्ड गणेश मंडळ
  • भारत चौक गणेश मंडळ
  • महाराजा गणेश मंडळ (उईके राजुरा)
        या सर्व मंडळांनी रात्री ११.१५ वाजेपर्यंत साऊंड सुरू ठेवला. त्यामुळे पोलिसांनी मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांवर कलम २२३ बी.एन.एस. अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

📌 सुरज ठाकरे यांची प्रतिक्रिया
        सुरज ठाकरे यांनी संताप व्यक्त करत सांगितले की “गणेशोत्सव हा श्रद्धा आणि परंपरेचा उत्सव आहे. पोलीस प्रशासनाने दाखल केलेले गुन्हे अन्यायकारक आहेत. मंडळांचे कार्यकर्ते गुन्हेगार नाहीत. गुन्हे मागे घेतले नाहीत तर आम्ही उच्च न्यायालयात लढा देऊ. यापूर्वीही गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दांडिया, गरबात रात्री उशिरापर्यंत डिजे वाजलेले आहेत. त्या वेळी पोलिसांनी कार्यवाही का केली नाही? याचे पुरावे आमच्याकडे आहेत. ते आम्ही न्यायालयात सादर करू. जर हे गुन्हे मागे घेतले नाहीत तर मग सर्वांवरच कार्यवाही करण्यास पोलिसांना भाग पाडू.” समोर नवरात्री येत आहे मग नवरात्रीत दांडिया, गरबात १० वाजता नंतर वाजणाऱ्या डीजे, साउंड सिस्टमवर पोलीस काय कारवाई करतील यावरही आमचे लक्ष राहणार आहे असा इशाराही सुरज ठाकरे यांनी दिला. 

📌 गणेश मंडळांचा इशारा
        पत्रकार परिषदेत उपस्थित सातही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनीही प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. गुन्हे मागे घेण्यात आले नाहीत तर यापुढे व्यापक आंदोलन करण्याची भूमिका घेण्यात येईल व हायकोर्टात जाण्याची सुद्धा तयारी करतील असे त्यांनी स्पष्ट केले.

\#GaneshFestival #RajuraNews #SurajThakre #CommunityVoices #JusticeForMandals #FaithAndTradition #GaneshVisarjan #PoliceAction #SocialMovement #LegalFight #congress #jaybhavanikamgarsanghtna #ganeshmandal #rajurapolicestation #policstationrajura #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top