Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: Vande Bharat Express: प्रवाशांना आसुसलेल्या नागपूर सिकंदराबाद वंदे भारत ट्रेनला आता 20 ऐवजी फक्त 8 डबे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Vande Bharat Express: प्रवाशांना आसुसलेल्या नागपूर सिकंदराबाद वंदे भारत ट्रेनला आता 20 ऐवजी फक्त 8 डबे आमचा विदर्भ - राजेश अरोरा, प्रतिनिधी...
Vande Bharat Express: प्रवाशांना आसुसलेल्या नागपूर सिकंदराबाद वंदे भारत ट्रेनला आता 20 ऐवजी फक्त 8 डबे
आमचा विदर्भ - राजेश अरोरा, प्रतिनिधी
बल्लारपूर (दि. 13 फेब्रुवारी 2025) -
        वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील सर्वात प्रीमियम ट्रेन आहे. त्यामुळे त्याचे भाडेही शताब्दी एक्स्प्रेसपेक्षा जास्त आहे. नागपूर ते सिकंदराबाद दरम्यान धावणाऱ्या वंदे भारतला प्रवाशांची कमतरता भासत आहे. त्यामुळे या ट्रेनमधील डब्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे.

        मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने 20101/20102 नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसच्या कोचच्या रचनेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सुधारित रचना 19 फेब्रुवारीपासून नागपूर आणि सिकंदराबाद या दोन्ही स्थानकांवरून सुटणाऱ्या गाड्यांना लागू होईल.

        यापूर्वी, ही ट्रेन एकूण 20 डब्यांसह चालत होती, ज्यामध्ये TSTC (पँटोग्राफसह ट्रेलर कोच), TSNDTC (नॉन-ड्रायव्हिंग ट्रेलर कोच), TSMT (मोटर कोच) आणि TSTDC (ड्रायव्हिंग ट्रेलर कोच) यांचा समावेश होता. सुधारित रचनेनुसार, ही ट्रेन आता एकूण 8 डब्यांसह चालेल, ज्यामध्ये TSMC (मोटर कोच), TSTC (ट्रेलर कोच), आणि TSNDTC (नॉन-ड्रायव्हिंग ट्रेलर कोच) यांचा समावेश असेल. ज्या प्रवाशांनी आधीच तिकीट बुक केले आहे त्यांना एसएमएसद्वारे बदलाची माहिती पाठवली जाईल. रेल्वे स्थानके आणि आरक्षण केंद्रांवर उद्घोषणे प्रणालीद्वारे देखील माहिती दिली जाणार आहे.

#aamchavidarbha #vidarbha #maharashtra #chandrapur #rajura #ballasrhah #vandebharatexpress #nagpur #Secunderabad #trainnumber #20101 #20102

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top