Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: Terror ; सार्वजनिक ठिकाणी तलवार घेऊन दहशत करणाऱ्या युवकाला अटक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Terror ; सार्वजनिक ठिकाणी तलवार घेऊन दहशत करणाऱ्या युवकाला अटक आमचा विदर्भ - राजेश अरोरा, प्रतिनिधी बल्लारपूर (दि. 13 फेब्रुवारी 2025) -    ...
Terror ; सार्वजनिक ठिकाणी तलवार घेऊन दहशत करणाऱ्या युवकाला अटक
आमचा विदर्भ - राजेश अरोरा, प्रतिनिधी
बल्लारपूर (दि. 13 फेब्रुवारी 2025) -
        शहरातील राजेंद्र वॉर्ड येथे सार्वजनिक ठिकाणी तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या युवकाला बल्लारपूर पोलीसांनी काल १२ फेब्रुवारी रोजी अटक केले. बल्लारपूर पोलीस स्टेशन चे गुन्हे शोध पथक १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता पेट्रोलिंग करीत असताना त्यांना माहिती मिळाली की राजेंद्र वॉर्ड येथे आरोपी योगेश शंकर एरोल वय २३ वर्ष हा सार्वजनिक ठिकाणी तलवार घेऊन दहशत निर्माण करत आहे. त्यावरून गुन्हे शोध पथकाने सापळा रचत आरोपी योगेश शंकर एरोल याला अटक केले. त्याच्या कडून एक लोखंडी तलवार जप्त केले.

        सदर कारवाई पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मदन दिवटे, सफौ आनंद परचाके, पोहवा रणविजय ठाकुर, संतोष पंडित, संतोष दंडेवार, पुरुषोत्तम चिकाटे, सुनील कामटकर, सत्यवान कोटनाके, पोअं लखन चव्हाण, खंडेराव माने, शरदचंद्र कारुष, शेखर माथनकर, विकास जुमनाके यांनी केले.

#aamchavidarbha #vidarbha #maharashtra #chandrapur #rajura #ballasrhah #terror #publicplace #policstationballarpur ##petroling

A-youth-who-terrorized-a-public-place-with-a-sword-was-arrested

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top