Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राज्यस्तरीय स्त्री रोग तथा प्रसूती तज्ञ डॉक्टर संघटनेची परिषद
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Council of Gynecology and Obstetrician Physicians Associations राज्यस्तरीय स्त्री रोग तथा प्रसूती तज्ञ डॉक्टर संघटनेची परिषद 35 वर्षानंतर चं...
Council of Gynecology and Obstetrician Physicians Associations
राज्यस्तरीय स्त्री रोग तथा प्रसूती तज्ञ डॉक्टर संघटनेची परिषद
35 वर्षानंतर चंद्रपूरकरांसाठी अभिमानाची बाब
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपुर (दि. 13 फेब्रुवारी 2025) -
        चंद्रपूर येथे होणाऱ्या 38 व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय स्त्री रोग तथा प्रसूती तज्ञ डॉक्टर संघटनेच्या परिषदेसाठी प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.वन अकादमी चंद्रपूर येथे शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी ला या परिषदेचे उद्घाटन माजी पालकमंत्री मा.आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष उपस्थितीत होणार असून, कार्यक्रमास डॉ.किरण कुर्टकोटी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य स्त्री रोग तथा प्रसूती रोग संघटना आणि डॉ. सुनिता तंदुलवाडकर, राष्ट्रीय अध्यक्ष, स्त्री रोग तथा प्रसूती रोग विशेषज्ञ संघटना यांची देखील उपस्थिती लाभणार आहे.

        अश्या प्रकारच्या प्रतिष्ठेच्या परिषदेचे आयोजन करण्याचा मान चंद्रपूर येथील स्त्री रोग तथा प्रसूती रोग तज्ञ डॉक्टरांच्या संघटन संस्थेला 35 वर्षानंतर मिळत आहे ही चंद्रपूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे . महिला आरोग्य, स्त्रीरोग चिकित्सा आणि प्रसूती विषयक नव्या तंत्रज्ञानासह विविध महत्त्वाच्या विषयांवर या परिषदेच्या माध्यमातून चर्चा होणार आहे. राज्यभरातील स्त्री रोग व प्रसूती तज्ञ डॉक्टर्स यामध्ये सहभागी होऊन आपल्या क्षेत्रातील नव्या घडामोडींवर मंथन करतील.

        या परिषदेच्या आयोजनासाठी डॉ.कल्पना गुलवाडे (आयोजन सचिव) आणि डॉ.मनीषा घाटे (अध्यक्ष, स्त्री रोग तथा प्रसूती तज्ञ डॉक्टर संघटना, चंद्रपूर) डॉ. मनीषा वासाडे, CGOS सचिव डॉ.नगीना नायडू, डॉ.मंगेश गुलवाडे (माजी अध्यक्ष IMA CHANDRAPUR), डॉ.संजय घाटे (अध्यक्ष IMA CHANDRAPUR) तसेच चंद्रपूर येथील सर्व स्त्री रोग व प्रसूती रोग डॉक्टर संघटनेचे सदस्य यांचे मोलाचे योगदान लाभणार आहे.

#aamchavidarbha #vidarbha #maharashtra #chandrapur #rajura #imachandrapur #mangesgulwde #drmangesgulwde

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top