Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्य शिवसेनेचा महिला मेळावा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Eknath shinde birthday celebrations in bhadrawati  एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्य शिवसेनेचा महिला मेळावा लाडक्या बहिणींनी केक कापून साज...
Eknath shinde birthday celebrations in bhadrawati 
एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्य शिवसेनेचा महिला मेळावा
लाडक्या बहिणींनी केक कापून साजरा केला लाडक्या भावाचा वाढदिवस
शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ. मीनलताई आत्राम यांचा पुढाकार
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर / बल्लारपूर (दि. १२ फेब्रुवारी २०२५) -
         शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ. मीनलताई आत्राम यांच्या वतीने महिला मेळावा घेण्यात आला. (Shiv Sena's women's meet on the occasion of Eknath Shinde's birthday)

        'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' ही जनमानसापर्यंत पोहोचली असून ही योजना महिलांना सक्षम करण्यासाठी राबविण्यात येत आहे. या योजनेमार्फत महिला भगिनींना त्यांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी आर्थिक मदत मिळत आहे. शासनाला फक्त पंधराशे रुपये देऊन थांबायचे नाही. तर महिला भगिनींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचे आहे. आणि त्यासाठी महिलांना ''लखपती दीदी'' बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे. ज्या दिवशी सर्व महिला भगिनी ''लखपती दीदी'' होतील तो दिवस सोन्याचा दिवस असेल. असे प्रतिपादन शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ. मीनलताई आत्राम यांनी केले. त्या शिवसेने द्वारा बल्लारपूर गेस्ट हाऊस येथे आयोजित महिला मेळाव्यात बोलत होत्या. 

        सौ. मीनलताई आत्राम यांनी म्हटले कि, महिलांच्या पाठीशी कणखर पणे उभे राहून सर्व बहिणींना सन्मान योजने अंतर्गत मदत करणारे आमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी कोणते हि भेदभाव पक्षपात न करता महाराष्ट्रातील सर्व जनतेची अहो रात्र करत दिन दलित, शोषित, पीडित शेतकरी, शेतमजूर, कामगार, जेष्ठ नागरिक, गोरगरीब जनतेची सेवा करून अनेक योजना काढल्या व सर्वांना लाभ दिला, त्यांनी शिवसेना पक्षाला अधिक मजबूत केले अशा आमच्या लाडक्या भावाला सर्व जनतेकडून आशीर्वाद रुपी मनस्वी शुभेच्छा मिळत असून त्यांना दीर्घ आयुष्य लाभावे अशी ईश्वर चरणी प्रार्थना करण्यात आली.    

        सौ. पुनम मसराम यांनी महिला मेळाव्याचे आयोजन केले असुन सदर कार्यक्रम सौ.मीनलताई आत्राम यांचे नेतृत्वात घेण्यात आला. यावेळी बल्लारपूर विधानसभा संघटिका सौ. कृष्णा सुरमवर, कामगार संघटना जिल्हा अध्यक्ष तथा चंद्रपूर शिवसेना तालुखा प्रमुख संतोष पारखी, शिवसेना पदाधिकारी सौ.पुनम मसराम, राम येरमे, भद्रावतीचे माजी नगरसेवक नानाभाऊ दुर्गे, विवेक दुर्गे, निखिल सुरमवर व इतर शिवसेना पदाधिकारी तसेच शेकडो महिला व नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते. 
#eknathshinde #birthday #matimand #bhojandan #minaltaiaatram #shivsena #bhadravati #autochalaksanghtna #cake #gajananmaharajmatimandvidyalay #nanadurge #aamchavidarbha #vidarbha #bhadrawati

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top