मतिमंद विद्यार्थ्यांना भोजनदान करून वाढदिवस साजरा
एकनाथ शिंदे यांचा वाढदिवसाप्रसंगी विविध उपक्रम
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १० फेब्रुवारी २०२५) -
आपण आपल्या व आपल्या चाहत्यांचा वाढदिवस लाखो रुपये खर्च करून वेगवेगळ्या पद्धतीने नेहमी साजरे करीत असतो, मात्र शिवसेना चंद्रपूर महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सौ. मिनलताई आत्राम यांनी शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे लाडके लोकप्रिय, लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ उपमुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवस निमित्ताने भद्रावती शहरातील संपूर्ण आटो चालक यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देत सत्कार करून तसेच गजानन महाराज मतिमंद विद्यालय भद्रावती येथे मतिमंद विद्यार्थी यांना भोजन दान व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी शिवसेना चंद्रपूर महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सौ. मिनलताई आत्राम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गोरगरीब जनता, शेतकरी शेतमजूर, दिनदलित बांधव, हातमजुर कामगार यांची अहोरात्र सेवा करून जनतेला न्याय देणारे, अनाथाचा नाथ असलेले एकनाथ शिंदे साहेब यांच्या लोकाभिमुख कार्याचे वर्णन करण्यात आले. यावेळी बाळु भाऊ उपलंचीवार, प्रकाश मेंढे, शिवसेनातालुका प्रमुख कामगार संघटना, नगरसेवक नानाभाऊ दुर्गे, योगेश म्यॅनेवार, मोहन कोरवन, सचिन जयस्वाल, विवेक दुर्गे, अभय दुर्गे, राधाबाई कोल्हे, मंदाताई धांडे, प्रेमिला क्रुष्णपलीवार, विधाताई कुचणकर, सुरेखा देठे तसेच ऑटोचालक संघटनेचे पदाधिकारी तथा ऑटोचालक, गजानन महाराज मतिमंद विद्यालयातील शिक्षकवृंद व विद्यार्थी तसेच शेकडो लाडक्या बहिणी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
#eknathshinde #birthday #matimand #bhojandan #minaltaiaatram #shivsena #bhadravati #autochalaksanghtna #cake #gajananmaharajmatimandvidyalay #nanadurge #aamchavidarbha #vidarbha #bhadrawati
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.