Seized 83 brass sand stock at Reti Ghat
शेवटी राजुरा तालुक्यातील ''त्या'' रेती घाटावरील 83 ब्रास रेती साठा जप्त
नदी पात्रात जेसीबी ने गड्डे करून केला मार्ग बंद
रेती तस्करावर ''मकोका'' कारवाईचे निर्देशांची आठवण करून देणार
रेती तस्करावर ''मकोका'' कारवाईचे निर्देशांची आठवण करून देणार
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०८ फेब्रुवारी २०२५) -
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कुठल्याही रेती घाटाचे लिलाव झालेले नसताना बांधकाम कंपन्याना व बांधकाम करणाऱ्या खाजगी लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये अवैध मार्गाने रेती पुरवण्यात येत आहे. विरुर स्टेशन परिसरातील मोठ मोठया रेती व्यवसायिकांनी व त्यांच्या हस्तकांनी राजकीय पाठबळ व राजकीय नेत्यांना भागीदार बनवून महसुल व विरुर पोलिसांसोबत आर्थिक साठगाठ करून मौजा कवीठपेठ - चिंचोली या गावालगत असलेल्या वर्धा नदी पात्राच्या टेम्बुर्डा घाटावरून अवैध रेती उत्खननाचा गोरखधंधा सुरु केला होता. विरूर येथील एका पत्रकाराला मारहाणीनंतर पत्रकारांनी सदर घाटवर भेट देत चित्रीकरण करून याबाबत पुरावे गोळा केले होते. त्याच अनुषंगाने आज शनिवार दि. ०८ फेब्रुवारीला वर्धा नदीपात्रातून अवैधरीत्या रेतीचे उत्खनन करणाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने स्थानिक महसूल विभागाच्या मंडळ अधिकाऱ्यांनी कवीठपेठ - चिंचोली या गावालगतच्या रेतीघाटावर धाड टाकली. यावेळी 83 ब्रास रेती अंदाजित किंमत जवळपास ५ लाख चा साठा जप्त करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी नदी पात्रात जाणाऱ्या मार्गावर जेसीबी ने गड्डे करून मार्ग बंद केला. सदरची कारवाई मंडळ अधिकारी सुभाष साळवे, तलाठी दामोधर शेंडे, पोलीस पाटील संतोष नेव्हारे यांनी इतर बाजुजेचे कास्तकार सोबत केली.
विरूर स्टेशन परिसरातून मागील अनेक महिन्यापासून अवैध रेती तस्करीचा गोरखधंदा जोमात सुरु होता. मात्र अचानक झालेल्या एका प्रकरणानंतर हे ठिकाण चर्चेत आले. सन्मित्र ग्राम विकास संस्था गडचांदूरचे संस्थापक अध्यक्ष विजय झेड. ठाकरे यांनी यांनी आमचा विदर्भ चे प्रतिनिधी यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की ७ फेब्रुवारी रोजी त्यांनी जिल्हाधिकारी श्री विनय गौड़ा यांना त्यांच्या कक्षामध्ये दुपारी प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांनी रेती तस्करी बाबत सविस्तर चर्चा करून तक्रार दाखल केली. जिल्ह्याधिकाऱ्यांनी त्यांना जीपीएस कॅमेरा सिस्टम द्वारा घेतलेल्या छायाचित्रांची मागणी केली असता त्यांनी जीपीएस कॅमेऱ्याचे फोटो उपलब्ध करून दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई चे आदेश देत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असे सांगितले.
सन्मित्र ग्रामविकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय ठाकरे यांनी सांगितले कि, येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सदर मुद्दा उपस्थित करण्यासाठी विविध पक्षाच्या आमदारांना संपूर्ण माहिती देण्यात येईल आणि लवकरात लवकर महसूल मंत्री यांची भेट घेऊन महसूल मंत्री यांनी रेती तस्करावर मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे जे निर्देश पोलीस प्रशासनास दिले होते, त्यांच्या त्या निर्देशांची त्यांना आठवण करून देण्यात येईल अशी माहिती विजय ठाकरे यांनी दिली आहे.
राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन परिसरातील मोठ मोठया रेती व्यवसायिकांनी व त्यांच्या हस्तकांनी राजकीय पाठबळ व राजकीय नेत्यांना भागीदार बनवून महसुल व पोलिसांसोबत आर्थिक साठगाठ करून मौजा कवीठपेठ, चिंचोली या गावालगत असलेल्या वर्धा नदी पात्राच्या टेम्बुर्डा घाटावरून कोट्यवधी रुपयाची अवैध रेती उत्खनन केली अशी चर्चा सुरु आहे. सध्या एक घाट बंद झाले असले तरी राजुरा तालुक्यातील इतरत्र घाटावरून सुरु असलेल्या अवैध घाटावरही कारवाई होणार कि त्यांना ''अभय'' मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
#aamchavidarbha #vidarbha #maharashtra #chandrapur #rajura #retighatauction #sandsmuggling #tractor #hiwa #tahasilofficerajura #revenueboardofficer #policestationwirurstation #retighat #jcb #roadclosed #seizedsandstock #cllectorofficechandrapur #kavithpet #chincholi #dhanora #wardhariver #wirurstation #circleofficer #talathi #policepatil #sanmitragramvikassansthagadchandur #founderpresident #vijaythackeray #collector #vinaygowda #revenueministerchandrasekharbawankule #superintendentofpolicechandrapur
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.