Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सफाई कामगारांच्या कामबंद आंदोलनाला भाजप कामगार मोर्चाचा पाठिंबा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सफाई कामगारांच्या कामबंद आंदोलनाला भाजप कामगार मोर्चाचा पाठिंबा आमदार मुनगंटीवार 10 फेब्रुवारीला घेणार बैठक आमचा विदर्भ - राजेश अरोरा, प्रति...
सफाई कामगारांच्या कामबंद आंदोलनाला भाजप कामगार मोर्चाचा पाठिंबा
आमदार मुनगंटीवार 10 फेब्रुवारीला घेणार बैठक
आमचा विदर्भ - राजेश अरोरा, प्रतिनिधी
बल्लारपूर (दि. ०८ फेब्रुवारी २०२५) -
        बल्लारपूर नगरपरिषदेच्या अस्थाई सफाई कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे थकीत वेतन मिळावे या मागणीसाठी सुरू झालेल्या काम बंद आंदोलनाला भाजप कामगार मोर्चाने पाठिंबा दिला आहे.

        मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस अजय दुबे यांनी मुख्याधिकाऱ्यांशी प्रलंबित वेतनाबाबत चर्चा केली असता, गेल्या जून महिन्यापासून पंधराव्या वित्त आयोगाचे अनुदान न मिळाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र स्थानिक आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून 10 फेब्रुवारी रोजी बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी भाजयुमो चे प्रदेश सचिव मिथलेश पांडे, अभिषेक ईदनुरी उपस्थित होते. 

#sudhirmungantiwar #bhartiyajantayuvamorcha #ballarpur

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top