Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सोशल मीडियावरून ॲड. वामनराव चटप यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा व विरूर पोलीस ठाण्यात तक्रार; दोषींवर कठोर कारवाईची मागणी २१ सप्टेंबरला विरूर येथे निषेध आंदोलन आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. ...
राजुरा व विरूर पोलीस ठाण्यात तक्रार; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
२१ सप्टेंबरला विरूर येथे निषेध आंदोलन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २० सप्टेंबर २०२५) –
        शेतकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्या विरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह आणि बदनामीकारक पोस्ट केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने शेतकरी संघटना आणि युवकांत तीव्र संताप व्यक्त झाला असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

        शेतकरी संघटना युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष ॲड. दीपक चटप यांनी राजुरा पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत, विरूर स्टेशन येथील एका इसमाने फेसबुकवर अपमानकारक मजकूर पोस्ट केल्याचे नमूद केले आहे. याशिवाय गजानन ढवस, जीवन आमने, जयराज दोरखंडे, विशाल जिवतोडे या युवकांनी विरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून या प्रकाराचा निषेध केला.

        ॲड. वामनराव चटप हे तीन वेळा राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार राहिले असून, शेतकरी हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. अशा नेत्याविरोधात सोशल मीडियावर केलेली खोटी व द्वेषपूर्ण पोस्ट ही फक्त त्यांच्या प्रतिमेवर घाव नसून संपूर्ण शेतकरी चळवळीवर हल्ला असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. शेतकरी संघटना आणि युवकांनी इशारा दिला आहे की, जर तातडीने गुन्हा नोंदवून आरोपींना अटक झाली नाही, तर तीव्र आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल. शेतकऱ्यांच्या नेतृत्वाचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.

        दरम्यान, या प्रकरणाच्या निषेधार्थ २१ सप्टेंबर रोजी विरूर येथे निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आक्षेपार्ह पोस्टमागील मास्टरमाईंड शोधून त्याच्यावरही कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते ॲड. मुरलीधर देवाळकर, माजी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती निळकंठ कोरांगे, माजी नगराध्यक्ष रमेश नळे, बाजार समितीचे माजी सभापती प्रभाकर ढवस, ॲड. श्रीनिवास मुसळे, दिलीप देठे, कपिल इद्दे, सय्यद शब्बीर, मदन सातपुते, आबाजी धानोरकर, मधूकर चिंचोलकर, नरेंद्र काकडे आदींनी व्यक्त केली आहे.

#Rajura #Virur #FarmersMovement #WamanraoChatap #ChandrapurNews #Vidarbha #JusticeForFarmers #SocialMediaAbuse #FarmersProtest #advwamanraochatap #advdeepakchatap #rameshnale #shetkarisanghtna #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top