Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: Women entrepreneurs कु. एलिजा बोरकुटे यांना प्रतिष्ठित महिला पुरस्कार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Women entrepreneurs कु. एलिजा बोरकुटे यांना प्रतिष्ठित महिला पुरस्कार महिला उद्योजक समाजात एक महत्त्वाचा घटक आमचा विदर्भ - दीपक शर्मा  नागपू...
Women entrepreneurs
कु. एलिजा बोरकुटे यांना प्रतिष्ठित महिला पुरस्कार
महिला उद्योजक समाजात एक महत्त्वाचा घटक
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
नागपूर (दि. ०९ मार्च २०२५) -
        (Women Entrepreneurship) महिला उद्योजकता ही समाजाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. समाजात महिलांच्या कर्तृत्वाला गौरव देण्यासाठी, (SNS Daughters Institute) एस एन एस डॉटर्स संस्था आणि (Radio Mirchi) रेडिओ मिर्ची नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, हॉटेल सेंटर पॉइंट, नागपूर येथे प्रतिष्ठित महिला पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात (Jehovah Yireh Foundation) यहोवा यिरे फाऊंडेशनच्या अध्यक्षा कु. एलिजा रमेश बोरकुटे (Mrs. Elijah Ramesh Borkute) यांना प्रतिष्ठित महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (International Women's Day)

       पुरस्कार स्वीकारल्यानंतर कु. एलिजा बोरकुटे यांनी महिला उद्योजकतेबद्दल आपले विचार व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, "महिला उद्योजकता ही केवळ व्यवसायासाठी महत्त्वाची नाही, तर ती सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी देखील अत्यंत गरजेची आहे. महिलांनी आर्थिक स्वावलंबनासाठी पुढे यावे आणि नवकल्पना, जिद्द व मेहनतीच्या जोरावर यश संपादन करावे."

महिला उद्योजकांचे समाजातील योगदान:
  • नवीन संधी निर्माण: महिला उद्योजक नवीन व्यवसाय आणि उत्पादने विकसित करून रोजगार निर्मितीला चालना देतात.
  • रोजगार निर्मिती: महिला उद्योजक थेट आणि अप्रत्यक्षपणे रोजगार निर्माण करून आर्थिक विकासाला हातभार लावतात.
  • आर्थिक प्रगती: महिला उद्योगपतींच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत उत्पादन, कर भरणा आणि गुंतवणुकीचा सकारात्मक परिणाम होतो.

महिला उद्योजकांसाठी यशस्वी होण्याच्या टिप्सही कु. एलिजा बोरकुटे यांनी दिल्या :
  • एक मजबूत व्यवसाय योजना तयार करा.
  • विपणन आणि जाहिरातीच्या माध्यमातून व्यवसायाची जागरूकता वाढवा.
  • ग्राहकांना उत्तम सेवा देऊन विश्वास निर्माण करा.
  • नवीन उत्पादने आणि सेवा विकसित करून व्यवसाय वाढवा.

        महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार, विविध संस्था आणि समाज एकत्र येत आहेत. सरकारकडून आर्थिक मदत, प्रशिक्षण आणि संसाधने उपलब्ध करून दिली जात आहेत. संस्था नेटवर्किंग आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून मदतीचा हात देत आहेत. समाजातील सकारात्मक दृष्टिकोन वाढवून महिलांना उद्योजकतेच्या प्रवासात आधार दिला जात आहे.

       या सोहळ्याला (Marathi actress Kranti Redkar Wankhede) मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर वानखेडे, अतिरिक्त आयुक्त (IRS) समीर वानखेडे (Sameer Wankhede), महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Maharashtra State Revenue Minister Chandrashekhar Bawankule), तसेच अंतरराष्ट्रीय महिला मानवाधिकार आणि अपराध नियंत्रण परिषदेचे महाराष्ट्र सचिव डॉक्टर रमेशकुमार बोरकुटे (Dr. Ramesh Kumar Borkute) यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन एस एन एस डॉटर्स संस्थेच्या संस्थापक सौ. नेहा गोडबोले, सौ. संगीता नायर आणि (deshonnati) देशोन्नती न्यूज पेपरचे महाव्यवस्थापक रितेश नायर यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी अनेक प्रतिष्ठित महिलांचा पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. महिला उद्योजकता ही समाजाच्या विकासाची गुरुकिल्ली आहे. महिलांना प्रोत्साहन देऊन आणि त्यांच्या कर्तृत्वाला दाद देऊन आपण सर्वजण अधिक उज्ज्वल भविष्य घडवू शकतो!

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top