Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: Illegal sand smuggling वर्धा नदीतून अवैध रेती तस्करी जोमात: प्रशासनाचे दुर्लक्ष?
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Illegal sand smuggling वर्धा नदीतून अवैध रेती तस्करी जोमात: प्रशासनाचे दुर्लक्ष? आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांनाही न घाबरणारे रेती तस्कर आमचा विद...
Illegal sand smuggling
वर्धा नदीतून अवैध रेती तस्करी जोमात: प्रशासनाचे दुर्लक्ष?
आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांनाही न घाबरणारे रेती तस्कर
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १२ मार्च २०२५) -
        (Wardha River) वर्धा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती तस्करी सुरू आहे, तालुक्यातील कोहपरा, मूर्ती, विहीरगाव, सिंधी, पाचकमानी, बोडकूची पळ, विरूर स्टेशन, देवाडा आणि सोंडो परिसरात दिवसाढवळ्या रेती तस्करी होत असल्याने पर्यावरण आणि स्थानिक नागरिकांवर गंभीर परिणाम होत आहे.

        (police station rajura) राजुरा पोलीस ठाण्यात आयपीएस प्रभारी अधिकारी यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर अवैध व्यवसायांवर मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे. रेती तस्करी, कोळसा तस्करी, अवैध दारू विक्री, सट्टा पट्टी आणि जेंडामुंडी यांसारख्या अनैतिक धंद्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे अवैध कामे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. मात्र, महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने कोहपरा, मूर्ती, विहीरगाव, सिंधी, पाचकमानी, बोडकूची पळ, देवाडा, सोंडो परिसरातून अवैध रेती तस्करी जोमात सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उपविभागीय अधिकारी आयएएस उच्च शिक्षित असून त्यांना अंधारात ठेवले जात आहे आणि महसूल विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने तस्करांना मोकळीक दिली जात आहे. अधिकारी कारवाई करणार हि माहिती अगोदरच महसूल विभागातील काही कर्मचारी तस्करांना  देत असून कारवाई होण्याअगोदरच रेती तस्कर सावध होत आहे. 

पाचकमानी, बोडकूची पळ जंगल परिसरात रेतीचा मोठा साठा
        विहीरगाव रेल्वे स्टेशन च्या समोर अतिदुर्गम जंगल, महसूल व रेल्वे परिसरातून जाणाऱ्या पाचकमानी पुलिया व बोडकूची पळ याच्या एकदम आत जंगल परिसरातूनही मोठ्या प्रमाणात नाल्यातून रेती उपसा करून मोठ मोठे साठे तयार करून ठेवण्यात आले आहे. मात्र याकडे प्रशासनांचे दुर्लक्ष आहे. 

कोहपरा, मूर्ती, विहीरगाव, सिंधी घाटातून रेती तस्करी
        वर्धनदीच्या कोहपरा, मूर्ती, विहीरगाव, सिंधी घाटातून रेती तस्करी जोमात सुरु असून येथील रेती तस्करांना महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विशेष आशीर्वाद असल्याचे बोलले जात आहे.

''हमारा कोई बाल बाका नही कर सकता''
        ''हमारा कोई बाल बाका नही कर सकता'' म्हणत देवाडा, सोंडो परिसरातून अवैध रेती तस्करांनी चक्क प्रशासनालाच आवाहन दिले आहे. देवाडा, सोंडो परिसरातले नाले आणि जंगल परिसरातून येथील तस्कर मोठ्या दराने रेती विक्री करत आहे. 

महसूल विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे तस्करांचे फावले
         (Revenue Department Rajura) महसूल विभागाने विरूर परिसरात एका घाटावर मोजणी करून मोठे खड्डे तयार करत रेती तस्करी रोखण्याचा प्रयत्न केला होता. या रेतीघाटावरून नेमकी किती ब्रास रेती गेली याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी एक टीमही सर्वे करण्याकरिता २८ फेब्रुवारी २०२५ ला पाठविली होती. त्या टीम ने घाटावर सर्वे करून अहवाल दिला होता. मात्र त्या अहवालात काय झालं हे अजूनही गुलदस्त्यात आहे. आता मात्र पुन्हा ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरू झाली आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे तस्करांचे फावले असून, कायद्याचे उल्लंघन करून खुलेआम तस्करी सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top