Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: Women's Day Special सायबर क्राईम रोखण्यासाठी कुटुंबसंवाद वाढवा - निशा भुते
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Women's Day Special सायबर क्राईम रोखण्यासाठी कुटुंबसंवाद वाढवा - निशा भुते महिला दिनी विशेष मार्गदर्शन आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (...
Women's Day Special
सायबर क्राईम रोखण्यासाठी कुटुंबसंवाद वाढवा - निशा भुते
महिला दिनी विशेष मार्गदर्शन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १२ मार्च २०२५) -
        आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत प्रत्येक व्यक्ती यांत्रिक होत चालली आहे. स्वतःसाठी जगण्याचा विसर पडत आहे. घरातील प्रत्येक सदस्यांसोबत सुसंवाद ठेवा, लहान मुलांसोबत मनमोकळ्या गप्पा मारा, अन्यथा त्यांना मोबाईलच्या आहारी जाण्यापासून रोखणे कठीण होईल, असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक निशा भुते यांनी केले. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त (Patanjali Yoga Committee) पतंजली योग समिती संचालित मंगल प्रभात महिला योग वर्ग व महिला ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शक म्हणून सौ. भुते बोलत होत्या.

        या कार्यक्रमात सौ. निशा भुते यांनी सायबर क्राईमविषयी जागृती करत पालकांनी मुलांसोबत अधिक वेळ घालवावा व संवाद वाढवावा, असे मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. रोहिणी डोरलीकर यांनी "महिलांचे आरोग्य", सौ. मृणाली ठाकरे यांनी "महिलांचे अधिकार", तर अ‍ॅड. अंजली गुंडावार यांनी "महिलांच्या हक्कांविषयी" मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती सौ. तेजस्विनी कावळे होत्या, तर उद्घाटन सौ. अर्चना देवराव भोंगळे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. संभाजी वारकड, जिल्हा सह संघटन मंत्री पुंडलिक उराडे, प्रा. हरिभाऊ डोरलीकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

        या प्रसंगी दिव्यांग असूनही स्वबळावर स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या सौ. निमगडे व त्रिपाठी यांचा सत्कार करण्यात आला. विविध योग व नृत्य सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता मंगल प्रभात योग वर्गाच्या साधक व साधिका सरला आंबटकर, रमा आईटलावार, रेखा बोढे, वंदना पोटे, वंदना रणदिवे, अंजली मोरे, पुष्पा सोयाम, माधुरी भोयर, संतोषी, खदाव,  सुनिता जमदाळे, सुरेखा उराडे, वनिता उराडे, प्राची कावळे व इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. संचालन सौ. स्नेहा सातपुते व सौ. रूपाताई भलावी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. शिल्पा बर्डे यांनी मानले. या कार्यक्रमास महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवला.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top