International Women's Day
महिला नेतृत्त्व व उद्योजकतेचा सन्मान
चंद्रपूरमध्ये जागतिक महिला दिन विशेष कार्यक्रम
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १३ मार्च २०२५) -
यहोवा यिरे फाऊंडेशन तर्फै जेष्ठ नागरिक संघ कार्यालय रामनगर चंद्रपूर येथे अंतराष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्त महिला नेतृत्त्व व कामगिरी पुरस्कार व बैकीग क्षेत्र प्रशिक्षण ठेवण्यात आले होते.
कार्यक्रमात तीनशेहून अधिक महिला व पुरुषांनी सहभाग घेतला. समाज आणि उद्योग क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या २६ महिलांना "महिला नेतृत्त्व व कामगिरी पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. (Jehovah Yireh Foundation) यहोवा यिरे फाऊंडेशनचे सीईओ डॉ. रमेशकुमार बोरकुटे (Dr. Ramesh Kumar Borkute) यांनी (Learn, Earn and Progress) "शिका, कमवा व प्रगती करा" या संकल्पनेअंतर्गत ८२ युवक-युवतींना नियुक्तीपत्र देऊन बँकिंग क्षेत्रात रोजगार मिळवून दिला. यावेळी प्रमुख पाहुणे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी महिला व पुरुष उद्योजकांना उद्योग प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन केले.
यहोवा यिरे फाऊंडेशनच्या अध्यक्ष कु. एलिजा बोरकुटे (Elijah Borkute) यांनी महिला उद्योजकतेच्या महत्त्वावर प्रकाश टाकत सांगितले की, "महिला उद्योजकता ही समाज आणि अर्थव्यवस्थेसाठी एक महत्त्वाची शक्ती आहे. महिला नव्या संधी निर्माण करून रोजगार वाढवतात आणि आर्थिक विकासात मोलाचा वाटा उचलतात. महिला उद्योजकांनी कोणत्याही अडचणींना न घाबरता आपला ठसा उमटवावा."
या वेळी कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरणे, बँकिंग प्रशिक्षक विवेकानंद चंदनखेडे, प्रकल्प अधिकारी संदीप जाने, डॉ. रमेशकुमार बोरकुटे, शिक्षणतज्ज्ञ डॉ. रत्ना चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या सौ. कल्पना शंकर, सौ. मर्सी फ्रांसिस कुमार (सेंट फ्रांसिस स्कूल, चंद्रपूर) आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यश्वीतेकरिता यहोवा यिरे फाऊंडेशनच्या टीमने विशेष परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.