Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: Police Route March राजुरा पोलिसांचा रूट मार्च
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Police Route March राजुरा पोलिसांचा रूट मार्च आगामी सण शांततेत साजरे करण्याचे आवाहन आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. १३ मार्च २०२५) -   ...
Police Route March
राजुरा पोलिसांचा रूट मार्च
आगामी सण शांततेत साजरे करण्याचे आवाहन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १३ मार्च २०२५) -
        होळी आणि रंगपंच शिवजयंती, गुडीपाडवा, रमजान ईद सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था कायम राहावी यासाठी राजुरा पोलिस ठाण्याच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला. गुरुवारी सकाळी 10.30 वाजता पोलिस ठाण्यातून सुरुवात झालेल्या या रूट मार्चचे नेतृत्व (IPS) (Aniket Hirde) ठाणेदार अनिकेत हिरडे (आयपीएस) यांनी केले. (Police Station Rajura)

        रूट मार्च तहसील कार्यालय, पत्रकार भवन, जुने बस स्थानक, डॉ. आंबेडकर चौक, नेहरू चौक, गांधी चौक, भारत चौक, मार्केट परिसर, नाका क्रमांक ३ आणि संविधान चौक मार्गे पोलिस ठाण्यात परत आला. या रूट मार्चमध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत पवार, शंकर आत्राम, निशा भूते, नन्नावरे, पोलिस उपनिरीक्षक भिष्मराज सोरते यांच्यासह ३५ पोलिस अंमलदार, पोलिस शिपाई आणि ४० होमगार्ड जवान सहभागी झाले.

        राजुरा शहरात आगामी सण शांततेत आणि पारंपरिक उत्साहात साजरी करण्याचे आवाहन ठाणेदार अनिकेत हिरडे यांनी नागरिकांना केले आहे. पोलिसांनी शहरातील प्रमुख चौक आणि भागांमध्ये अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला असून, रात्र-दिवस गस्त वाढवण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवरही कठोर कारवाई केली जात आहे. ग्रामीण भागातही पोलिस लक्ष ठेवून आहेत.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top