Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: accident उभ्या ट्रकला एसटीची धडक; वाहक ठार, 13 प्रवासी गंभीर जखमी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
accident उभ्या ट्रकला एसटीची धडक; वाहक ठार, 13 प्रवासी गंभीर जखमी एसटी कर्मचाऱ्यांचे आगारात आंदोलन, मृत वाहकाच्या कुटुंबाला 50 लाखांच्या मदत...
accident
उभ्या ट्रकला एसटीची धडक; वाहक ठार, 13 प्रवासी गंभीर जखमी
एसटी कर्मचाऱ्यांचे आगारात आंदोलन, मृत वाहकाच्या कुटुंबाला 50 लाखांच्या मदतीची मागणी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. 15 मार्च 2025) -
        शहरालगतच्या पडोली चौकात उभ्या असलेल्या मालवाहू ट्रकला एसटी बस धडकल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात बसच्या वाहकाचा मृत्यू झाला, तर 13 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे चौकातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

        ही घटना चंद्रपूर-नागपूर महामार्गावर रात्री घडली. महामार्गालगत मोठ्या संख्येने मालवाहू ट्रक उभे असतात, ज्यामुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या चौकात पोलिस ठाणे असले तरी, ट्रान्सपोर्ट मालकांशी असलेल्या स्नेहसंबंधांमुळे कारवाई टाळली जाते, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

स्थानीय नागरिकांचा संताप
        अपघातानंतर सकाळी स्थानिक नागरिकांनी ट्रकचालकांना जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाद वाढू नये म्हणून पोलिसांनी मध्यस्थी केली. याच ठिकाणी दोन दिवसांपूर्वी राख वाहून नेणारा ट्रक उलटल्याने परिसरात राख पसरली आहे. त्यावरून वाहने गेली की राख उडते आणि धुके पडल्यासारखे चित्र निर्माण होते. या धुळीने समोरचे वाहनही दिसत नाही. अजूनही ही राख उचलण्यात आलेली नाही. चौकातील 
त्यामुळे वाहनचालक, दुकानदार व नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन
        अपघातात मृत्यू झालेल्या एसटी वाहक संदीप वनकर यांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत देण्यात यावी, तसेच ट्रक कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी एसटी कर्मचारी संघटनेने केली आहे. या मागण्यांसाठी चंद्रपूर एसटी आगारातील वाहक आणि चालकांनी आज सकाळपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत एकही एसटी बस आगाराबाहेर पडू दिली जाणार नाही, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

रस्ता मोकळा करण्याची गरज
        पडोली चौकात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिक आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून महामार्गालगत उभ्या राहणाऱ्या ट्रकवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top