Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: Eradication of superstition अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमातून जनजागृती
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Eradication of superstition अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमातून जनजागृती ग्रामपंचायत पाचगाव व श्री शिवाजी कॉलेज राजुरा यांचा संयुक्त उपक्रम आमचा ...
Eradication of superstition
अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमातून जनजागृती
ग्रामपंचायत पाचगाव व श्री शिवाजी कॉलेज राजुरा यांचा संयुक्त उपक्रम
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. १६ मार्च २०२५) -
        विश्वास, भक्ती, श्रद्धा ही मानवी जीवनाची अविभाज्य अंगं असून, ती स्वीकारताना प्रश्न पडणे आवश्यक आहे की हे वास्तव आहे की भुलभुलैया? आज भोळ्याभाबड्या, अशिक्षित तसेच सुशिक्षित लोकांच्या मनाचा वेध घेऊन चमत्कार व भीती दाखवून लुबाडण्याचा प्रकार वाढताना दिसतो. जादूटोणा, भुत- पिशाच्च, चमत्कार या भ्रामक कल्पना नसून शुद्ध फसवणूक आहे. अशा प्रवृत्तींपासून सावध राहण्याचे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सचिव धनंजय तावाडे यांनी उपस्थित जनसमुदायासमोर काही प्रयोग करून केले.

        ग्रामपंचायत पाचगाव व श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने ''अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन'' या उपक्रमांतर्गत अंधश्रद्धा निर्मूलनावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. क्रांतीवीर शहीद बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात अभिवादन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य बापुराव मडावी होते. प्रमुख अतिथी व मार्गदर्शक धनंजय तावाडे, शिवाजी महाविद्यालयाचे प्राध्यापक विश्वास शंभरकर, प्रा.डॉ. विठ्ठल आत्राम, प्रा. वसाके, प्रा. सागर ओडेलीवार, दिवाकर मडावी आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच पोलीस पाटील शंकर खामनकर, तमुस अध्यक्ष प्रकाश कोहपरे, माजी सरपंच शंकर गोनेलवार, सदस्य मनोज कुरवटकर, पिसा पेंदोर, भास्कर लाड, माजी पंचायत समिती सदस्या सुनंदा डोंगे, सदस्या शुभांगी गोनेलवार, पार्वता तलांडे, ग्रामविकास अधिकारी सुनील कुमरे, शामराव कोटनाके, जंगा सिडाम आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

        प्रा. विश्वास शंभरकर यांनी अंधश्रद्धेपासून दूर राहून आपल्या पाल्यांना शिक्षणात सहभागी करण्याचे आवाहन केले. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व ग्रामस्थांना समजावून सांगितले. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. विठ्ठल आत्राम यांनी केले, प्रास्ताविक प्रा. वसाके यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रा. सागर ओडेलीवार यांनी मानले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय मेश्राम, सोनू सिडाम, रामा आळे, भाऊजी मंडाळी, मारोती शेडमाके, प्रविण आळे, सुभाष मेश्राम, संजू कोटनाके, प्रदीप शेडमाके, सुदर्शन सिडाम यांनी सहकार्य केले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top