Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अल्ट्राटेक सिमेंट कंपनी विरोधात आंदोलनाला सुरुवात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अल्ट्राटेक सिमेंट कंपनी विरोधात आंदोलनाला सुरुवात विविध मागण्यांसाठी नांदा गेटवर भाजपचे आंदोलन आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत गडचांदूर (दि. ...
अल्ट्राटेक सिमेंट कंपनी विरोधात आंदोलनाला सुरुवात
विविध मागण्यांसाठी नांदा गेटवर भाजपचे आंदोलन
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत
गडचांदूर (दि. १६ मार्च २०२५) -
        अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या हेकेखोर धोरणाच्या विरोधात कोरपना तहसील भारतीय जनता पार्टी व अल्ट्राटेक कंपनीच्या दत्तक गावातील नागरिकांच्या वतीने कंपनीच्या नांदा प्रवेशद्वाराजवळ रविवार, दिनांक १६ मार्च रोजी सकाळी १० वाजता आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. या आंदोलनात कंपनीचा मुख्य मार्ग अवरोधित करून वाहतूक बंद करण्यात आली. कंपनीच्या मुख्य मार्गावर बंदी येताच सिमेंट कंपनी प्रशासनाने समस्येवर तोडगा काढण्यासाठी तातडीने बैठक बोलावली.

        अल्ट्राटेक सिमेंट कंपनीने आजूबाजूच्या गावांना दत्तक घेतले असून त्या गावांच्या समस्या सोडविणे हे कंपनी प्रशासनाचे कर्तव्य आहे. परंतु, गेल्या काही वर्षांपासून कंपनी प्रशासनाने या मुद्याकडे दुर्लक्ष केले आहे. स्थानिक जनतेच्या अनेक प्रश्नांची व मागण्यांची पूर्तता कंपनी प्रशासन सहज करू शकत असूनही अद्याप त्यांची दखल घेतली नाही. भाजपच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
  • पोलीस स्टेशन ते नथ्थु कॉलनीपर्यंत रोडवरील धूळ नियमितपणे स्वच्छ करून सकाळ-संध्याकाळ दोन वेळा पाणी मारणे.
  • नांदा व आजूबाजूच्या परिसरात कंपनीच्या धुळीमुळे होणाऱ्या वायुप्रदूषणावर उपाययोजना करणे.
  • नांदा गेटसमोरील झेंड्याजवळ लोडेड वाहनांमुळे निर्माण होणारी चिकणसर थांबवण्यासाठी रस्त्यावर नवीन काँक्रीट टाकणे.
  • उर्वरित लोडर भरती त्वरीत सुरू करून स्थानिक बेरोजगारांना रोजगार देणे.
  • कंपनीच्या वायुप्रदूषणामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असल्याने त्यांना हेक्टरी ५०,०००/- रुपये नुकसानभरपाई देणे.
  • ओव्हरलोडेड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था होत असल्याने अशी वाहतूक थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे.
  • सीएसआर निधीतून दत्तक गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या पांदन रस्त्यांचे काम प्राधान्याने करणे.
  • सीएसआर निधीतून दत्तक गावातील रहिवाशांना विविध योजनांचा लाभ देऊन त्याची माहिती गावातील चावडीवर प्रसिद्ध करणे व दत्तक गावातील ITI तसेच पदवीधर युवकांना कंपनीच्या नोकरभरतीत प्राधान्य देणे.
         या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात भाजपा तालुका अध्यक्ष संजय मुसळे, तालुका भाजपा महामंत्री सतीश उपलेंचीवार, गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष अरविंद डोहे, नांदा शहराध्यक्ष संजय नित, रवी बंडीवार, सतीश जमदाडे, ताकसांडे, हरी बोरकुटे आणि दत्तक गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला..

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top