बल्लारपूर -
शहरातील लाकूड व्यावसायिकाला वन अधिकारी असल्याचे सांगत तब्बल 15.5 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लाकूड व्यावसायिक लक्ष्मन पटेल यांनी 11 जुलै ला बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दिली. आरोपी 36 वर्षीय सुधाकर जितेंद्र सिंह रा. बेल थरा जि. बलिया याने फिर्यादी पटेल यांना प्रत्यक्ष भेटत आपण साईड बिजनेस म्हणून सागवान चा व्यापार करण्याचा सल्ला दिला. विशेष म्हणजे आरोपी सुधाकर सिंह यांनी स्वतःला मध्यप्रदेशातील हाउमरिया टायगर प्रोजेक्ट येथे सहायक वन अधिकारी म्हणून नोकरीला आहे असे सांगितले.
पटेल यांनी सिंह यांचेवर विश्वास टाकत व सिंह यांनी सागवान लाकडांची एक खेप आपल्याकडे पाठवितो व ते सागवान आपण बाजारात विकावे असे सांगत पटेल यांचेकडून 15.5 लाख रुपये एडव्हान्स म्हणून घेतले. मात्र आरोपी सिंग यांनी लाकूड पाठविलेच नाही. आपली फसवणूक झाली हे लक्षात येताच पटेल यांनी बल्लारपूर पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी सिंह ला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो वारंवार निवास बदलत असल्याने तो अटकेच्या बाहेर होता. आरोपी हा उत्तरप्रदेश येथील वाराणसी जिल्ह्यात असल्याची माहिती मिळताच बल्लारपूर पोलीस स्टेशनमधून पोलीस पथक 16 जुलैला पाठविले व 18 जुलै ला पोलिसांनी आरोपी सिंह याला ताब्यात घेत बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे आणून अटक केली. आरोपी सुधाकर सिंह यांनी अजून कुणासोबत फसवणुकीचा प्रकार केला का? याबाबत चौकशी करीत आहे. आरोपीला 23 जुलै पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस उपविभागीय अधिकारी राजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली.
बातम्या अधिक आहेत....
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.