Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
धर्मांतर प्रकरणात 3 जणांना अटक आरोपींना पकडण्यासाठी असा रचला सापळा वाचा सविस्तर..... आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स नागपूर - उत्तर प्रदेशाती...
  • धर्मांतर प्रकरणात 3 जणांना अटक
  • आरोपींना पकडण्यासाठी असा रचला सापळा
  • वाचा सविस्तर.....
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
नागपूर -
उत्तर प्रदेशातील दहतशतवाद विरोधी पथकाने शुक्रवारी मध्यरात्री केलेल्या कारवाईत उत्तम गौरवच्या बेकायदेशीर धर्मातरण प्रकरणात तिघांना नागपुरातून अटक करण्यात आली. कौसर आलम, रामेश्वर कावरे उर्फ अॅडम, डॉ अर्सनाल उर्फ भुपेंद्र बन्दो अशी एटीएसच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत.
उत्तर प्रदेशातील एटीएसच्या पथकाने याआधीही उमर गौतम, मुफ्ती जहांगीर आलम, सलाउद्दीन इरफान शेख, राहूल भोला, मन्नू यादव उर्फ अब्दुल मन्नान या पाच जणांना बेकायदेशीर धर्मांतरण प्रकरणात अटक केली होती. या पाचही जणांनी देशातील विविध राज्यांमध्ये धर्मांतरण जाळे पसरले आहे, अशी माहिती एटीएसच्या पथकाला मिळाली होती. अनुसिचित जाती जमातींमधल्या लोकांची दिशाभूल करून ही टोळीने अनेकांचे मुस्लिम धर्म स्विकारण्यासाठी प्रलोभने देत होती.
अवैध धर्मांतरण प्रकरणात नागपुरातील गणेशपेठ परिसरातून प्रकाश कावरे उर्फ अॅडम हा ३० वर्षीय तरुण महाराष्ट्राचे नेटवर्क सांभाळत होता. पदव्युत्तर विद्यार्थी असलेला अॅडमची पत्नी हसन अली ही इजिप्तची नागरिक आहे. अॅडम हा उत्तम गौरवच्या संपर्कात असून तो महाराष्ट्रात धर्मांतरणाचे जाळे विस्तारत आहे, अशी कुणकूण एटीएसच्या पथकाला लागली होती. उमर गौरवच्या या नेटवर्कमध्ये अॅडमसोबत कौसर, डॉ. अर्सनाल, विजय वर्गीय, डॉ. फराज हे देखील संपर्कात होते. हे सर्वजण मिळून समाजमाध्यमांवर एक ग्रुपही चालवित होते, अशी माहितीही एटीएसच्या पथकाला लागली होती.
झारखंड येथील लोहियाबाद येथील रहिवासी असलेला कौसर आलम हा बी बियाणांचे दुकान चालवितो. बीयाणांच्या उद्योगाचा आधार घेऊन तोही धर्मांतरणाचे जाळे विस्तारत होता. उमर गौतम आणि कौसर आलम हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात आहेत. तर डॉ. अर्सनाल हा गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील रहिवासी आहे. हिजामा थेरेपीतून शिक्षण घेतलेल्या डॉ. अर्सनाल हा विपूल विजय वर्गीय, अॅडम आणि गौतमचा धर्मातरण अजेंडा महाराष्ट्रात राबवित होते.
उद्योगाच्या आडून हे सर्वजण महाराष्ट्रासह कर्नाटकातही धर्मातरणाचे जाळे विस्तारत होते. उमर गौतमने २०१८ मध्ये घेतलेल्या रिव्हर्ट गेटटुगेदरमध्येही हे सगळे सहभागी झाले होते, याचे पुरावे एटीएसच्या पथकाच्या हाती लागले. त्या आधारे एटीएसच्या उत्तर प्रदेशातील पथकाने या तिघांनाही नागपुरातून अटक केली. तिघांनाही अटक केल्यानंतर एटीएसचे पथक शनिवारी तडकाफडकी रस्ता मार्गे लखनऊकडे रवाना झाले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top